Pune PMC Recruitment | पुणे महानगरपालिकेत भरतीप्रक्रिया; ‘या’ रिक्त पदांसाठी होणार काहीच दिवसांत परीक्षा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महानगरपालिकेत लवकरच पदभरती केली जाणार आहे. (Pune PMC Recruitment) शहरातील अनेक तरुण – तरुणींचे या भरतीकडे लक्ष लागले आहे. महापालिकेतर्फे वर्ग एक ते तीनमधील रिक्तपदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पालिकेमध्ये (Pune PMC News) एकूण 320 जागांसाठी ही प्रक्रिया घेतली जाणार असून त्यासाठी आतापर्यंत 10 हजार 171 अर्ज प्राप्त झाले आहेत. या पदांसाठी येत्या 22 जून व 5 जुलै रोजी ऑनलाइन स्वरुपात परीक्षा घेतली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. (Pune PMC Recruitment)

 

दुसऱ्या टप्प्यातील या 320 जागांसाठी मागील 6 मार्च ते 30 एप्रिल दरम्यान इच्छुक उमेद्वारांकडून अर्ज मागवण्यात आले होते. या पदभरतीमध्ये आरोग्य विभाग (Health Department), अग्निशमन (Fire Department) विभागातील रिक्त पदे भरण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. येत्या 22 जून रोजी ‘क्ष’ किरण तज्ज्ञ (X-Ray Specialist), वैद्यकीय अधिकारी (Medical Officer,), उप संचालक (प्राणी संग्रहालय) (Deputy Director, Animal Museum), विद्युत कनिष्ठ अभियंता (Electrical Junior Engineer), अग्निशमन विमोचन (Fire Extinguisher) या पदांसाठी परीक्षा पार पडेल तर 5 जुलै रोजी आरोग्य निरीक्षक (Health Inspector) , वरिष्ठ आरोग्य निरीक्षक (Senior Health Inspector), वाहन निरीक्षक (Vehicle Inspector), पशु वैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) आणि औषध निर्माता (Drug Manufacturer) या पदांसाठी परीक्षा घेतली जाईल.

महापालिकेची ही दुसरी भरती (Pune PMC Recruitment) असून या आधी मागील वर्षी 447 जागांसाठी पालिकेने भरती प्रक्रिया राबवली होती.
आता या दुसऱ्या टप्प्यात 320 जागांसाठी भरती होत आहे. उमेद्वारांना परीक्षेच्या सात दिवस आधी प्रवेशपत्र दिले जातील,
असे पालिकेतर्फे सांगण्यात आले आहे. ही अनेक शिक्षित तरुणांसाठी ही भरती एक सुवर्णसंधी असणार आहे.

 

Web Title :  Pune PMC Recruitment | Recruitment Process in Pune Municipal Corporation;
Examination for these vacancies will be held in a few days

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा