Pune PMC School News | महापालिकेच्या शाळा 15 जूनपासून सुरू होणार – अतिरिक्त महापालिका आयुक्त विलास कानडे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC School News | पुणे महापालिकेच्या शाळा १५ जूनपासून सुरू होणार आहेत. शाळा सुरू करण्यापुर्वी शाळांची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदी बाबी युद्धपातळीवर करून घेण्याबाबत महापालिका आयुक्तांनी आदेश दिले आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विलास कानडे (PMC Additional Commissioner Vilas Kanade) यांनी दिली. (Pune PMC School News)

 

जूनच्या दुसर्‍या आठवड्याच्या शेवटी आगामी शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. मागील दोन वर्षातील बहुतांश कालावधी हा कोरोनामध्ये गेल्याने जवळपास सर्वच शाळा बंद राहील्या. काही शाळांमध्ये आठवी ते दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले होते. परंतू या वर्गातील उपस्थितीही ऐच्छिकच ठेवण्यात आली होती. कोरोनाचे सर्व निर्बंध हटल्यामुळे यंदाच्यावर्षी १३ जूनपासून बहुतांश शाळा सुरू होणार आहेत. महापालिकेच्या शाळा सुरू करण्याबाबत आवश्यक तयारीचा आढावा घेण्यासाठी आज आयुक्त विक्रम कुमार यांनी अधिकार्‍यांची बैठक बोलवली होती. या बैठकीमध्ये १३ जूनपासून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांची ड्युटी सुरू करण्याचा निर्णय झाला. १३ आणि १४ जून रोजी शाळांतील स्वच्छता व आवश्यक बाबींची तपासणी पूर्ण करून विद्यार्थ्यांना १५ पासून शाळेत बोलवावे, असे आदेश आयुक्तांनी दिले. (Pune PMC School News)

महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी १५ जूनपासून पीएमपी बस पाससाठी मुख्याध्यापकांकडून पत्र देण्यास सुरूवात करण्यात येणार आहे.
महापालिकेने विद्यार्थी बसपासचे पैसे देखिल पीएमपीएमएलकडे वर्ग करण्याची तयारी केली आहे.
यासोबतच विद्यार्थ्यांना युनिफॉर्म व अन्य शालेय साहित्याचे पैसे देखिल लवकरात लवकर डीबीटीद्वारे उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्यानंतर लवकरात लवकर अभ्यासक्रमाची पुस्तके व अन्य साहित्यही उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विलास कानडे यांनी दिली.

 

 

Web Title :- Pune PMC School News | Pune Municipal Corporation PMC schools will start from June 15 Additional Municipal Commissioner Vilas Kanade

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा