Pune PMC Sewage Treatment Plant (STP) Project | मुळा- मुठा नदीसुधार योजनेतील 11 एस.टी.पी. प्लांटस्चे काम ऑक्टोबरमध्ये सुरू होणार – महापालिका आयुक्त विक्रम कुमार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Sewage Treatment Plant (STP) | जपानच्या जायका कंपनीच्या (jica) सहकार्यातून होणार्‍या नदी सुधार प्रकल्पाअंतर्गत (Mula-Mutha Riverfront Development) ११ मैलापाणी प्रक्रिया प्रकल्पांचे (एसटीपी प्लांट) काम ऑक्टोबर महिन्यांत सुरू करण्यात येणार आहे. यासोबतच जुन्या एसटीपी प्लांटमध्येही हरित लवादाच्या निर्देशानुसार बदल करावे लागणार असून त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच समाविष्ट २३ गावांमध्येही एस.टी.पी. प्लांटस् उभारावे लागणार आहेत. यासाठी मोठ्याप्रमाणावर निधीची गरज लागणार असून जायका कंपनीसोबतच केंद्राच्या अमृत २ या योजनेतून व राज्य सरकारकडून मदत मागण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar PMC Commissioner) यांनी दिली. (Pune PMC Sewage Treatment Plant (STP)

 

मुळा- मुठा नदी सुधार योजनेअंतर्गत Mula-Mutha Riverfront Development (STP Plant) शहरात गोळा होणारे मैलापाणी प्रक्रिया करून सोडण्यात येणार आहे. यासाठी नदी काठावर ११ ठिकाणी एस.टी.पी. उभारण्यात येणार आहेत. या कामाच्या निविदेला सात महिन्यांपुर्वी मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाच्या मार्फतीने आर्थिक मदत देणार्‍या हे काम करणार्‍या जायका कंपनीचे अधिकारी मंगळवार, बुधवारी पुणे दौर्‍यावर होते. या पथकाने एस.टी.पी. प्लांट उभारण्यात येणार्‍या जागांची पाहाणी केल्यानंतर संयुक्त बैठकही झाली. या बैठकीमध्ये जायकाच्या अधिकार्‍यांनी प्रकल्पाच्या कामांबाबत अपडेटस दिले. (Pune PMC Sewage Treatment Plant (STP) Project)

यासंदर्भात माहिती देताना महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले, की ११ एस.टी.पी. प्लांटसचे काम ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे. या कामासाठी आवश्यक जमिन महापालिकेच्या ताब्यात आली आहे. कामाच्या ठिकाणी माती परिक्षण व सर्व तांत्रिक अभ्यास पूर्ण झाला असून प्लांटस्च्या डिझाईन देखिल तयार झाल्या आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षात हे प्लांटस् पुर्ण होउन वापरात येतील.

 

यासोबतच हरित लवादाच्या निर्देशानुसार जुन्या एस.टी.पी. प्लांटसचे ऑडीट करण्याचे काम महाप्रीत या संस्थेला देण्यात आले आहे. जुन्या एस.टी.पी. प्लांटसमध्ये लवादाच्या निर्देशानुसार प्रक्रिया केलेले पाणी नदीमध्ये सोडण्यापुर्वी त्यावर पुन्हा एकदा प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक ते बदल करावे लागणार आहेत. यासाठी शक्य तिथे दुरूस्ती करण्यात येईल किंवा काही प्लांटस् पाडावे देखिल लागणार आहेत. अद्याप हा अहवाल आलेला नाही. प्राथमिक माहितीनुसार यासाठी ४५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यासोबतच समाविष्ट २३ गावांमधील मैला पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी आणखी नवीन प्लांटस् उभारावे लागणार आहेत. या संपुर्ण कामांसाठी जायका कंपनीकडून आर्थिक मदतीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच केंद्राच्या अमृत २ योजनेत आणि राज्य सरकारकडूनही निधीची मागणी करण्यात येईल, अशी माहिती विक्रम कुमार यांनी दिली.

नवीन मेट्रो मार्गासाठी महापालिकेला २ हजार कोटी रुपयांचा खर्च
खडकवासला ते हडपसर मार्गे खराडी, वनाज ते चांदणी चौक आणि माणिकबाग या सुमारे ४३ कि.मी.च्या
मेट्रो (Pune Metro) मार्गीकेचा आराखडा महामेट्रोने (Mahametro) महापालिकेला दिला आहे.
या आराखड्यानुसार होणार्‍या खर्चापैकी दोन हजार कोटी रुपये अथवा या किंमतीची जमिन महापालिकेने महामेट्रोला द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या आराखड्याचा पुढील १५ दिवसांमध्ये अभ्यास करण्यात येईल. यानंतर यासंदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाच्या
माध्यमातून केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

 

Web Title :- Pune PMC Sewage Treatment Plant (STP) Project | 11 STPs in Mula-Mutha river improvement scheme. The work of the plants will start in October – Municipal Commissioner Vikram Kumar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chhagan Bhujbal | छगन भुजबळांनी हिंदू समाजाची माफी मागावी, अन्यथा…, भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांचा इशारा

Sunny Leone | बापरे! सनी लिओनीच्या नावाने होतेय मोठी फसवणूक; अभिनेत्रीने स्वत:च केलं अलर्ट, म्हणाली…

Pankaja Munde | ‘…तर मोदीही मला संपवू शकत नाही’, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर विधानसभेचा दाखला देत बंधू धनंजय मुंडे म्हणाले…