Pune PMC Tax | पुणे महापालिका ! पहिल्या 57 दिवसांत पालिकेच्या मिळकत कर विभागाचे 751 कोटी 31 लाख रुपयांचे उत्पन्न

शनिवार, रविवारी सीएफसी सेंटर्स खुली राहाणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Tax | महापालिकेला 2022 – 23 या आर्थिक वर्षात पहिल्या 57 दिवसांतच मिळकत करातून तब्बल 751 कोटी 31 लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे.
मागील आर्थिक वर्षीच्या तुलनेत 190 कोटी 77 लाख रुपये अधिक उत्पन्न मिळाले आहे.
पहिल्या दोन महिन्यांत मिळकत कर भरणार्‍या मिळकतधारकांना सर्वसाधारण करामध्ये 10 टक्के सवलत देण्यात येते.
ही मुदत 31 मे रोजी संपत असून नागरिकांना कर भरण्यासाठी शनिवार (दि.28) आणि रविवारी (दि.29) देखिल सीएफसी सेंटर्स सुरू ठेवण्यात येणार आहेत. (Pune PMC Tax)

 

शहरातील तब्बल 4 लाख 92 हजार 752 मिळकत धारकांनी 1 एप्रिलपासून मिळकत कर भरला आहे.
यातून महापालिकेला 751 कोटी 31 लाख रुपये महसूल मिळाला असून नागरिकांनाही 16 कोटी 60 लाख रुपये सवलत मिळाली आहे.
मिळकत कर आकारणी आणि संकलन विभागाने आज अखेरपर्यंत 10 लाख 74 हजार 69 मिळकतधारकांना एसएमएस तसेच 8 लाख 11 हजार 894 मिळकत धारकांना ई मेल पाठविले आहेत. (Pune PMC Tax)

मिळकत कर भरण्यासाठी नागरिकांनी डिजीटल पेमेंटला प्राधान्य दिले आहे.
ऑनलाईन पेमेंटद्वारे 3 लाख 39 हजार 290 मिळकतधारकांनी अर्थात 68.86 टक्के मिळकत धारकांनी 466 कोटी 85 लाख रुपये भरणा केला आहे.
90 हजार 233 मिळकतधारकांनी 70 कोटी 10 लाख रुपये रोख स्वरुपात तर धनादेशाद्वारे 63 कोटी 239 नागरिकांनी 214 कोटी 35 लाख रुपये कर भरणा केला आहे.

 

 

Web Title :- Pune PMC Tax | Pune Municipal Corporation 751 crore 31 lakh income of income tax department
in the first 57 days

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा