Pune PMC Tax | सर्वसाधारण सभेने दिलेली ‘सवलतीची’ उपसूचना फेटाळून ! प्रशासनाच्या प्रस्तावाप्रमाणेच समाविष्ट 23 गावांत करआकारणीचा महापालिकेचा निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Tax | महापालिकेमध्ये समाविष्ट २३ गावांना मिळकतकर आकारण्याच्या प्रस्तावाला महापालिका आयुक्त व प्रशासक विक्रम कुमार (PMC Commissioner and Administrator Vikram Kumar) यांनी मान्यता दिली. परंतू ही मान्यता देताना विक्रम कुमार यांनी सर्वसाधारण सभेने समाविष्ट गावांना करामध्ये सवलत देण्याबाबत दिलेल्या उपसूचना फेटाळल्या असून प्रशासनाने ठेवलेल्या मूळ प्रस्तावानुसार अंमलबजावणी होणार आहे. (Pune PMC Tax)

 

मागीलवर्षी २३ गावांचा महापालिकेमध्ये समावेश करण्यात आला आहे.
या गावांना महापालिकेच्या नियमानुसार मिळकतकर आकारणीचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीच्या माध्यमातून सर्वसाधारण सभेपुढे ठेवला होता.
ग्रामपंचायतींकडे मिळकत कर भरणार्‍या मिळकतींना ‘ज्या सालचे घर त्या सालचा दर’, तर उर्वरीत मिळकतींना महापालिकेच्या दराप्रमाणे मिळकत कर आकारणी करण्याचे प्रशासनाच्या प्रस्तावात नमूद करण्यात आले होते.
यापुर्वी १९९७ व २०१७ मध्ये महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमध्येही अशीच कर आकारणी करण्यात आलेली आहे.
समाविष्ट गावांकडून पहिल्यावर्षी २० टक्के, पुढील वर्षी ४० अशी पाच वर्षांपर्यंत दरवर्षी २० टक्के वाढ करून पाचव्यावर्षी शंभर टक्के आकारणी करण्याचे प्रशासनाने प्रस्तावीत केलेले आहे.
समाविष्ट गावांना लगतच्या महापालिका हद्दीचीच रेटेबल व्हॅल्यू लावण्यात आली आहे.
दरम्यान, हा प्रस्ताव मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेपुढे आल्यानंतर सर्वसाधारण सभेने २३ गावांमध्ये महापालिका अद्याप नागरी सुविधा पुरवत नाही.
त्यामुळे त्यांना महापालिकेच्या जुन्या हद्दीप्रमाणे कर न लावता त्यामध्ये सवलत द्यावी,
अशी उपसूचना सर्वपक्षीय सदस्यांनी दिली होती. (Pune PMC Tax)

फेब्रुवारी महिन्यात मंजूर झालेल्या या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली नव्हती.
आज महापालिका आयुक्त व प्रशासक विक्रम कुमार यांनी नगरसेवकांनी दिलेली उपसूचना वगळून प्रशासनाच्या प्रस्तावानुसारच समाविष्ट २३ गावांमध्ये कर आकारणी करण्याचा निर्णय घेतला असून तसे आदेश मिळकत कर आकारणी व संकलन विभागाला दिले आहेत.

 

 

Web Title :- Pune PMC Tax | Rejecting the sub instruction given by the General Assembly Pune Municipal Corporations decision of tax in 23 villages included as per the administrations proposal

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा