Pune PMC Water Supply | पुणेकरांसाठी खुशखबर ! शहरात 11 ते 26 जुलै दरम्यान नियमित पाणी पुरवठा होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Water Supply | मागील पाच ते सहा दिवसांपासून पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या धरण साखळी परिसरात चांगला पाऊस (Pune Rains) झाल्याने धरणांच्या पाणी पातळीत समाधानकारक वाढ झाली आहे. यामुळे नियमित पाणी पुरवठा करण्याची तारीख पुणे महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) पाणीपुरवठा विभागाने (Pune PMC Water Supply) वाढवून ती आता 11 जुलै ते 26 जुलै केली आहे. या कालावधीत शहराला नियमित पाणी पुरवठा होणार आहे. पावसाने दडी मारल्याने काही दिवसांपूर्वी धरणातील पाणीसाठ्याचा विचार करून महापालिकेने एक दिवसाआठ पाणीपुरवठा करण्याचे जाहीर केले होते.

 

काही दिवसांपूर्वी शहराला पाणी पुरवठा करणार्‍या धरणांमधील पाणी पुरवठा कमी झाल्याने पुणे महापालिकेने दिनांक 4 ते 11 जुलै दरम्यान एक दिवसआड पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर केले होते. यानंतर 10 तारखेला असलेल्या आषाढी एकादशी आणि बकरी ईद विचारात घेता दिनांक 8 ते 11 जुलैपर्यंत दररोज पाणी पुरवठा नियमितपणे करण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यानच्या काळात धरण परिसरात चांगला पाऊस झाल्याने आजपर्यंत चारही धरणांमध्ये पाणीसाठी वाढल्याने दिनांक 11 जुलैपासून 26 जुलैपर्यंत दररोज पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या वतीने कळवण्यात आले आहे.

 

याबाबत पुणे महापालिकेचे मुख्य अभियंता (पाणीपुरवठा) अनिरूद्ध पावसकर (Aniruddha Pawaskar PMC)
यांनी सांगितले की, 26 जुलैनंतर पाणी वाटपाबाबतचा निर्णय त्या वेळच्या धरणांमधील
पाणीसाठ्याचा विचार करून कळविण्यात येईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी.

 

Web Title :- Pune PMC Water Supply | city will have regular water supply from
july 11 to july 26 pune municipal corporation pmc water supply

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा