Pune PMC Water Supply | पुणेकरांना दिलासा ! बकरी ईद व आषाढी एकादशीमुळे पुण्यातील पाणी कपातीच्या वेळापत्रकात बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Water Supply | गेल्या तीन दिवसापासून खडकवासला धरण साखळीच्या (Khadakwasla Dam) पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे या धरण साखळीतील पाणीसाठा चार टिएमसी पर्यंत पोहोचला आहे. पाऊस असाच सुरू राहील्यास लवकरच पाणी कपात (Water Cut) बंद होण्याची शक्यता आहे. दरम्यान, 10 जुलैला आषाढी एकादशी (Ashadi Ekadashi) आणि बकरी ईद (Bakri Eid) हे सण असून एकदिवसाआड पाणी पुरवठ्यातील त्रुटी दूर करण्यासाठी 8 ते 11 जुलै दरम्यान शहरात पुर्वीप्रमाणे पाणी पुरवठा (Pune PMC Water Supply) सुरू राहील, असे पाणी पुरवठा विभागाने (Water Supply Department) जाहीर केले आहे.

 

खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा अडीच टिएमसी पर्यंत खाली आल्याने 4 जुलैपासून महापालिकेने (Pune Municipal Corporation) पाणी कपातीसाठी एकदिवसाआड पाणी पुरवठा (Pune PMC Water Supply) सुरू केला आहे.
पहिल्या दिवशी वेळापत्रकानुसार पाणी पुरवठ्यामध्ये (Water Supply Schedule) फारशा अडचणी जाणवल्या नाहीत.
परंतू दुसर्‍या दिवशी अर्थात काल शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरातूनही मोठ्या प्रमाणावर तक्रारी सुरू झाल्या.
कमी दाबाने आणि कमी वेळ पाणी पुरवठ्यासोबतच काही ठिकाणी पाणी पुरवठा होत नसल्याच्या तक्रारींचा यामध्ये प्रामुख्याने समावेश होता.
अनेक सोसायट्यांना पाणी पुरवठा कमी झाल्याने विकतच्या टँकरने पाणी मागवावे लागले. तसेच आजही कर्वेनगरसह काही उपनगरांतून तक्रारी आल्या आहेत.

दरम्यान, मागील दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात पावसाचा (Pune Rain) जोर वाढला असून दोन दिवसांत दीड टीएमसी पाणीसाठा (Water Storage) वाढला आहे.
आजमितीला 4 टीएमसी पेक्षा अधिक पाणीसाठा झाला असून आणखी तीन दिवस पावसाचा जोर चांगला राहण्याचा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तविला आहे.
यामुळे धरणांत पुरेसा साठा होण्याची शक्यता बळावली आहे.
या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने आषाढी एकादशी आणि बकरी ईद निमित्त 8 ते 11 जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द केली आहे.
या कालावधीत एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरळित ठेवण्यासाठी तांत्रिक अडचणी दूर करण्यात येतील,
असे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

 

 

Web Title :-  Pune PMC Water Supply | Consolation to the people of Pune Changes in Pune water cut schedule due to Bakri Eid and Ashadi Ekadashi

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा