Pune PMC Water Supply | पुणे मनपाकडून मोफतच पाणीपुरवठा, पैसे मागितल्यास तक्रार करण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Water Supply | पुणे महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या 34 गावांमध्ये महापालिकेकडून दररोज 1200 टॅंकरच्या फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र, हे टँकर मोफत असताना पाणी घेऊन गेल्यानंतर टँकर चालक किंवा त्यांचे मदतनीस नागरिकांकडे पैसे मागत असल्याच्या तक्रारीचे प्रमाण वाढले आहे. हा प्रकार गंभीर असल्याने महापालिका प्रशासनाने नागरीकांनी अशा प्रकारे पैसे मागितल्यास तक्रार करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. नागरिकांना तक्रार करता यावी यासाठी टोल फ्री क्रमांक तसेच तक्रार क्रमांकही महापालिकेकडून उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप (Nandkishor Jagtap) यांनी दिली. (Pune PMC Water Supply)

पुणे महापालिकेमधील नवीन समाविष्ट गावांमध्ये तसेच, जुन्या हद्दीतील ज्या ठिकाणी पाण्याचा तुटवडा आहे त्या ठिकाणी मनपाच्या वतीने टँकर दिले जातात. हे टँकर पूर्णपणे मोफत दिले जातात. यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. यासाठी टँकर चालक पैसे मागत असल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिकांनी टँकर चालकांना पैसे देवू नयेत, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

टँकर चालकाने पैशांची मागणी केल्यास टँकर क्रमांक, संबंधित व्यक्तीचे नाव, तक्रारदाराचे नाव, पत्ता,
दूरध्वनी क्रमांकासह पुणे महापालिकेच्या टोल फ्री क्रमांक 18001030222 व व्हॉट्सअॅप क्रमांक 8888251001 वर
तक्रार करावी किंवा PMC CARE App डाउनलोड करुन त्यावर फोटो आणि पुराव्यासह तक्रार नोंदवावी.
या तक्रारीची पुणे मनपा प्रशासनाकडून तात्काळ दखल घेतली जाईल असे आवाहनही पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Pawar On Praful Patel | प्रफुल्ल पटेलांची 840 कोटींची केस सीबीआयने बंद केली,
आता काहीही बोलू शकतो असं त्यांना वाटतंय : रोहित पवार

Pune Police News | पुणे: पोलिस कर्मचाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या