Pune PMC Water Supply News | पुणे: शहराच्या ‘या’ भागाला एकवेळ पाणीपुरवठा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Water Supply News | पर्वती येथील MLR टाकी वरून अस्तित्वातील 900 मि.मी. व्यासाच्या मोठ्या प्रमाणात लिकेज Prestres Line वरून पाणीपुरवठा करण्यात येतो. समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत (Equal Water Supply Scheme) पर्वती MLR टाकी ते जगताप हाऊस दरम्यान नव्याने टाकलेल्या 1473 मि.मी. व्यासाच्या पाण्याच्या लाईनचे काम पूर्ण झाले आहे. या लाईनच्या जोडणीची कामे सोमवार दिनांक 8/01/2024 ते 22/01/2024 दरम्यान करण्यात येणार आहेत. (Pune PMC Water Supply News)

यासाठी शहराच्या काही भागातील पाणीपुरवठा (Pune PMC Water Supply News) 800 मि.मी. व्यासाच्या पर्यायी लाईन मधून एक वेळ करण्यात येणार आहे. तसेच शहरातील काही भागांत 8/01/2024 ते 22/01/2024 या कालावधीत एक वेळ आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप (Chief Engineer Nandkishore Jagtap) यांनी दिली आहे.

पर्यायी लाईन मधून एक वेळ पाणी पुरवठा करण्यात येणारा भाग

प्र. क्र. 18 – स्वारगेट पोलीस लाईन (Swargate Police Line), झगडेवाडी खडकमाळ आळी, घोरपडी पेठचा संपूर्ण परिसर, मोमिनपुरा पूर्ण, टिंबर मार्केट, महात्मा फुले पेठ, गंजपेठ, गुरुवार पेठ, धोबी घाट, खडक पोलीस वसाहत (Khadak Police Colony), इत्यादी भाग

प्र. क्र. 19 – लोहिया नगर, इनामके मळा, घोरपडे पेठ, एकबोटे कॉलनी, काशिवाडी, गुरुनानकनगर, नेहरू रोड, पूर्ण भवानी पेठ परिसर, बालाजी व भवानी माता मंदिर परिसर, टिंबर मार्केट, नवीन नाना पेठ, हरकानगर, चुडामण तालीम इत्यादी भाग

प्र. क्र. 20 – भगवान दास चाळ, वायमेकर चाळ, न्यु नाना पेठ परिसर, राजेवाडी, पत्राचाळ SRA, भवानी पेठ पोलीस वसाहत (Bhawani Peth Police Colony), सोमवार पेठ पोलीस वसाहत, बरके आळी, पद्मजी सोसायटी परिसर, महीफिल वाडा, साठेवाडा, रमेश फर्निचर परिसर, सायकल सोसायटी इत्यादी भाग

प्र. क्र. 28 – मुकुंदनगर, व्हेईकल डेपो, अप्सरा टॉकीज परिसर,
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ (Tilak Maharashtra University), C.P. W.D. Quarter, रांका हॉस्पिटल परिसर, शंकरशेठ रोड एस. टी. स्टॅन्ड ते धोबी घाट परिसर उजवी बाजू, मीरा सोसायटी

प्र. क्र. 29 – लक्ष्मी नारायण चौकीच्या मागील वस्ती, मित्र मंडळ कॉलनी इत्यादी भाग.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर गोळीबार करणार्‍याचे नाव निष्पन्न, सोबत असलेल्यांनीच केला घातपात

‘बारामती अ‍ॅग्रो’वर ईडीची कारवाई, सुप्रिया सुळे म्हणाल्या, ”ही पाहिली वेळ नाही, यापूर्वी माझ्या बहिणींच्या…”