Pune PMC Water Supply | एक दिवसाआड पाणी पुरवठ्याबाबत पहिल्या दिवशी शहरातून एकही ‘तक्रार नाही’ ! 11 जुलैनंतर ‘वेळापत्रका’ची फेररचना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Water Supply | जून महिन्यांत पावसाने (Pune Rain) ओढ दिल्याने महापालिकेने आजपासून आठवड्याभरासाठी एक दिवसाआड पाणी पुरवठा (Pune PMC Water Supply)  करून पाणी बचतीचा मार्ग अवलंबला. एक दिवसाआड पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकामुळे (Water supply schedule) शहरातून कुठलिही तक्रार आलेली नाही. त्याचवेळी काल रात्रीपासून धरणक्षेत्रात पाऊस सुरू झाल्याने धरणातील पाणी साठा वाढू लागला आहे. 11 जुलैला पावसाचा अंदाज आणि धरणातील पाणीसाठा विचारात घेउन पाणी पुरवठ्याचे नवीन वेळापत्रक तयार करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार (Municipal Commissioner and Administrator Vikram Kumar) यांनी दिली.

 

जून महिन्यामध्ये पावसाने ओढ दिली. तर मागील दीड ते दोन वर्षात शहरातील शहर तसेच ग्रामीण भागातील पाणी वापर वाढल्याने खडकवासला धरणसाखळीमध्ये (Khadakwasla Dam) अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक राहीला आहे. या पार्श्‍वभूमीवर जलसंपदा विभागाच्या (Water Resources Department) सूचनेवरून महापालिकेने 4 जुलैपासून पाणी कपात करण्याची घोषणा मागील आठवड्यात केली होती. पाणी पुरवठा (Pune PMC Water Supply) करण्यात तांत्रिक अडचण येउ नये यासाठी पाणी पुरवठा यंत्रणेचे दोन भाग करुन त्याठिकाणी एक दिवसाआड पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार आजपासून या वेळापत्रकाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

 

पाईपलाईन रिक्त राहील्यास निर्माण होणार्‍या हवेच्या दाबामुळे पाणी पुरवठयात अडचणी येतात. ही तांत्रिक अडचण माहिती असल्याने पालिकेने पाईपलाईन भरलेल्या राहातील आणि पाणी पुरवठ्यात अडचणी येणार नाहीत यासाठी एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती विक्रम कुमार यांनी दिली. कालपासून धरण क्षेत्रात पाऊस सुरू झाल्याने धरणातील पाणीसाठा हळूहळू वाढू लागला आहे. त्यामुळे 11 जुलैपर्यंतची परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे विक्रम कुमार यांनी सांगितले.

15 टक्के पाण्याची बचत
शहरात आजपासून पाणी कपातीसाठी एक दिवसाआड पाणी पुरवठ्याचे नियोजन केले आहे. सुदैवाने दिवसभरात पाणी पुरवठ्याबाबत कुठलिही तक्रार आली नाही. धरण क्षेत्रात पाउस पडत असून हवामान खात्याने 7,8 आणि 9 तारखेला जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात चांगली वाढ होण्याची चिन्हे आहेत.
पाणी कपातीच्या निर्णयामुळे नेहमीच्या तुलनेत 15 टक्के पाण्याची बचत झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे
असे पाणी पुरवठा विभागाचे (Water Supply Department) अधीक्षक अभियंता अनिरूद्ध पावसकर (Water Supply Department) यांनी सांगितले.

 

10 तारखेला पाणी पुरवठा करावा
महापालिकेने पाणी कपातीसाठी वेळापत्रक तयार केले आहे. परंतू 10 जुलैरोजी बकरी ईद आणि आषाढी एकादशी (Ashadi Ekadashi) आहे.
त्यामुळे किमान 10 तारखेला संपुर्ण शहरात पाणी पुरवठा करावा, अशी विनंती रिपाइंचे पदाधिकारी शैलेंद्र चव्हाण (Shailendra Chavan),
डॉ. सिद्धार्थ धेंडे (Dr. Siddharth Dhende), बाळासाहेब जानराव (Balasaheb Janrao) आणि परशुराम वाडेकर (Parashuram Wadekar)
यांनी आज महापालिका आयुक्तांकडे केली. महापालिका आयुक्तांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला
असून 10 जुलैला संपुर्ण शहरात पाणी पुरवठा सुरू राहील असे सांगितल्याची माहिती डॉ. धेंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

Web Title :- Pune PMC Water Supply | No ‘complaints’ from the city on the first day about one day water supply! Redesign of schedule after July 11

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gulabrao Patil | ‘आम्हाला डुक्कर म्हणता, अहो याच डुकरांची मतं घेऊन खासदार झालात’, गुलाबरावांची संजय राऊतांवर घणाघाती टीका

 

CM Eknath Shinde | विधान परिषद निवडणुकीदरम्यान असं काय घडलं? आमदार सोबत कसे आले? – एकनाथ शिंदे

 

Monsoon Health Tips | मान्सूला झाली सुरुवात, चुकूनही खाऊ नका ‘या’ गोष्टी, बिघडू शकते तब्येत