Pune PMC Water Supply | …म्हणून पुणे शहरात गुरुवारी नेहमी प्रमाणे पाणी पुरवठा सुरू राहील; पुणेकरांना दिलासा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Water Supply | पुणे महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) पाणी पुरवठा विभागाकडून (PMC Water Supply Department) गुरूवारी पुणे शहरातील काही भागातील पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान हा निर्णय आता मागे घेण्यात आला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांच्या नियोजित पुणे दौऱ्यामुळे पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

 

पुणे महापालिकेचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर (Aniruddha Pawaskar pmc) यांच्या माहितीनुसार, ”पुणे शहरातील पर्वती (Parvati), लष्कर (Lashkar), एसएनडीटी (SNDT), होळकर व वारजे (Holkar And Warje) पाणी पुरवठा झोन अंतर्गत दुरुस्ती कारणाने पाणी पुरवठा बंद करण्याचे महापालिकेने नियोजन केले होते. मात्र, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नियोजित पुणे दौऱ्यामुळे ही पाणीकपात रद्द करण्यात आली आहे. गुरुवारी नेहमी प्रमाणे पाणी पुरवठा सुरू राहील,” असं सांगितलं आहे. (Pune PMC Water Supply)

 

दरम्यान, शहरातील अनेक भागामध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.
ही गैरसोय टाळण्यासाठी पाणी पुरवठा विभागाने गुरुवारी दुरुस्तीच्या कामानिमित्त पाणी बंद न करण्याचा निर्णय घेतला आहे.
ही कामे नंतर केली जाणार आहेत. उन्हाळ्यामध्ये महानगरपालिकेने पाणी बंदचा निर्णय मागे घेतल्याने पुणेकरांना एक दिलासा मिळाला आहे.

 

 

Web Title :- Pune PMC Water Supply | pune municipal corporation PMC cancelled water cut in city on the background of presidents visit

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा