Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल - विक्रम कुमार, महापालिका आयुक्त

पुणे –   पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Water Supply | पुणे महापालिकेमध्ये Pune Municipal Corporation (PMC) समाविष्ट करण्यात आलेल्या ३४ गावांमध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेने (PMC) आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. यापैकी सूस (Sus), म्हाळुंगे (Mahalunge) आणि बावधन बुद्रूक (Bavdhan Budruk) या तीन गावांतील पाणी पुरवठा योजनेचा आराखडा येत्या आठवड्यात मिळेल. त्यानुसार लवकरच निविदा प्रक्रिया (PMC Tender Process) राबवून कामाला सुरूवात करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner and Administrator Vikram Kumar ) यांनी दिली. (Pune PMC Water Supply)

समाविष्ट ३४ गावांमध्ये पाणी पुरवठ्यावरून पीएमआरडीए (PMRDA) आणि महापालिकेमध्ये ‘तू तू मैं मैं’ सुरू आहे. या गावांतील गावठाणांच्या हद्दीबाहेर झालेल्या बहुतांश वसाहतींना सध्यातरी टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे (PMC Supply Water By Tanker). मागीलवर्षी २३ गावे महापालिकेमध्ये समाविष्ट केल्यानंतर महापालिकेने या आर्थिक वर्षापासून टप्पेनिहाय कर आकारणी सुरू केली आहे. महापालिका कर आकारणी करत असेल तर पाणी पुरवठा व अन्य सुविधा देखिल पुरविण्यात याव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे. विशेष असे की या गावांमधील बांधकामांना पीएमआरडीएने बांधकाम परवानगी दिली असून विकसकांकडून पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी घेण्याच्या बोलीवरच ही परवानगी देण्यात आली आहे. मात्र, नुकतेच याप्रकरणी उच्च न्यायालयात (Mumbai High Court) दाखल याचिकेवर महापालिकेने पाणी पुरवठा करावा असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. (Pune PMC Water Supply)

यासंदर्भात महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांच्याकडे विचारणा केली असता, ते म्हणाले की ३४ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून समान पाणी पुरवठा अंतर्गत आराखडा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. गावांतील पाणी पुरवठ्याचा विचार करून अंदाजपत्रकातही भरीव तरतूद करण्यात आली आहे. या गावांमध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी पुरवठा झोननिहाय १० पॅकेजेस करण्यात आली आहेत. यापैकी सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक या गावचा आराखडा अंतिम टप्प्यात आला असून या आठवड्यात तो उपलब्ध होईल. या आराखड्यानुसार तत्काळ निविदा प्रक्रिया राबवून लवकरात लवकर काम सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.

याबाबत अधिकची माहिती देताना पाणी पुरवठा विभागाचे अधिक्षक अभियंता अनिरूद्ध पावसकर (Aniruddha Pawaskar PMC) यांनी सांगितले, की ३४ गावांसाठी १० पॅकेजेस मध्ये काम करण्यात येणार आहे. सध्या सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रुक या तीन गावांसाठीचा आराखडा अंतिम टप्प्यात आहे. बावधन बुद्रूक येथे महापालिकेच्यावतीने सध्या पाईपलाईननेच एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. येथे अतिरिक्त पाईपलाईन टाकून दररोज पाणी देण्याचे नियोजन आहे. ३४ गावांमध्ये फुरसुंगी (Fursungi) , देवाची उरूळी (Uruli Devachi) या कचरा डेपो (Garbage Depot) बाधित भागापाठोपाठ सूस, म्हाळुंगे मध्ये सर्वाधीक पाणी पुरवठा टँकरद्वारे होत आहे. आजमितीला दररोज ६० ते ७० टँकर पाणी पुरवावे लागते. आराखड्या नुसार या तीनही गावांमध्ये दीड ते दोन मिलियन लिटरच्या १७ ते १८ टाक्या बांधाव्या लागणार आहेत. यासाठी ऍमेनिटी स्पेस, गायरान व पीएमआरडीएच्या आराखड्यातील जागांचा विचार सुरू आहे.

३४ गावांतील पाणी पुरवठ्याची सद्यस्थिती

 • फुरसुंगी आणि देवाची उरूळी गावामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्यावतीने (Maharashtra Jeevan Pradhikaran) सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे.
  जून अखेर या योजनेतून या परिसराला पाणी पुरवठा होईल.
  यामुळे फुरसुंगी व देवाची उरूळीच्या ७० टक्के भागाला पाईपलाईनने पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे.

 

 • मांजरी (Manjari) गावातील महाराष्ट्र जीवन प्राधीकरण योजनेचे काम १५ ऑगस्ट अखेर पूर्ण होईल.
  यामुळे या भागातही पाईपलाईनने पाणी पुरवठा सुरू होईल.

 

 • वाघोलीला (Wagholi) महाराष्ट्र जीवन प्राधीकरण मार्फत पाणी पुरवठा होतो. परंतू तो वाढत्या लोकसंख्येमुळे अपुरा आहे.
  याठिकाणीही समान पाणी वाटप योजनेअंतर्गत काम पुर्ण करण्यासाठी प्रयत्न आहेत.