Pune PMC Workers Salary And Advance | महापालिका कर्मचार्‍यांना ‘सणावारा’साठी दिलेल्या ‘ऍडव्हान्स’ची वसुलीच होत नाही ! ऍडव्हान्स दिलेली रक्कम आणि वसुल झालेल्या रकमेचा ताळमेळच लागत नसल्याचा ठपका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Workers Salary And Advance | महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) कर्मचार्‍यांना सणावाराला ‘उचल’ (ऍडव्हान्स) म्हणून दिल्या जाणार्‍या रकमेची (Pune PMC Workers Salary And Advance) संबधित खात्याकडून ‘वसुली’च (Recovery) होत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामुळे प्रशासनाने यापुर्वीच्या वर्षात ऍडव्हान्स दिलेल्या रकमेची परतफेड झाल्याचा तक्ता मुख लेखा विभागाला पाठविल्याशिवाय यावर्षी (२०२२-२३) संबधित विभागातील कर्मचार्‍यांना सणावाराला उचलत न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

पुणे महापालिका तसेच फक्त आणि फक्त पुण्यातील राजकारणाच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

महापालिकेच्यावतीने महापालिकेच्या सर्व कर्मचार्‍यांना सणांसाठी १० हजार रुपये ऍडव्हान देण्यात येतो. ऍडव्हान म्हणून देण्यात आलेल्या या रकमेची पुढील दहा महिने समान हप्त्यांमध्ये वसुल करण्यात यावी असा निर्णय सर्वसाधारण सभेने (PMC General Body Meeting) २०१८ मध्ये घेतला आहे. ऍडव्हान म्हणून दिलेल्या या रकमेची संबधित कर्मचार्‍याच्या वेतनातून वसुली करूनच त्या महिन्याचे पगारबिल तयार करण्याची जबाबदारी ही संबधित खात्याचे पगारबिल लेखनिक यांच्यावर आहे.

परंतू मागीलवर्षी कर्मचार्‍यांना जेवढी रक्कम ऍडव्हान म्हणून देण्यात आली तेवढ्या रकमेची परतफेड झाल्याचे दिसून आलेले नाही.
याची दखल मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर यांनी घेतली आहे.
२०२१-२०२२ या आर्थिक वर्षामध्ये सर्व खात्यांनी ऍडव्हान आणि परतफेड झाल्याचा सेवकनिहाय ताळमेळ घालून अहवाल लेखा विभागाकडे सादर करावा.
हा अहवाल सादर केल्याशिवाय चालूवर्षी अर्थात २०२२-२३ मध्ये संबधित खात्याला सणांसाठी ऍडव्हान दिला जाणार नाही, असे सर्व विभागांना कळविले आहे.

 

Web Title :- Pune PMC Workers Salary And Advance | Advance given to PMC employees for festivals is not recovered! Complaint that the amount paid in advance and the amount recovered do not match

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | जास्तीचा नफा मिळवणं पडलं चांगलंच महागात, 21 लाखांना गंडा, ऑनलाइन फसवणुक करणाऱ्या दोघांवर FIR!

 

Anti Corruption Bureau (ACB) Latur | गुन्ह्यातील मुख्य आरोपीकडून लाच घेणारा पोलीस हवालदारच अडकला लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात!

 

Vaani Kapoor Killer Look | कॅज्युअल लुकमध्ये दिसली वाणी कपूर, पैपराझी समोर दिल्या किलर पोज..