Pune : ‘प्रवासी सेवेबरोबर एक पाऊल पुढे टाकून पीएमपीची शहराला मदत’ – पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहराची गरज ओळखून पीएमपीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन रक्तदान शिबिर नाही, तर अभियान राबवून नवी दिशा दिली. कोरोना कालावधीमध्ये रेल्वे स्टेशन, विमानतळावरून प्रवाशांना सेवा देत आहे. कोविड सेंटरमधून रुग्णांचे ने-आण करणे आणि स्मशानभूमीपर्यंत मृतांना नेण्यासाठी पीएमपीच्या कर्मचाऱ्यांनी जबाबदारी सांभाळून शहराला सर्वच बाबतीत मदत केली. पीएमपीच्या १५ आगारामध्ये एकाच दिवशी पाच हजार रक्ताच्या बाटल्या जमा करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनीही रक्तदानामध्ये सहभाग घेतला आहे, ही बाब निश्चितच अभिमानाची आहे, असे पीएमपीएमएलचे PMPML व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी सांगितले.

रक्ताचे नाते जाती-धर्मापलिकडचे असा संदेश देत पीएमपी प्रशासनाच्या वतीने पीएमपीच्या १५ आगारांमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले. मार्केट यार्ड पीएमपीएमएल PMPML आगारामध्ये रक्तदान शिबिराचे उद्घाटन पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पालिका सभागृहनेता श्रीनाथ भिमाले, व्यवस्थापक नारायण भांगे, अमोल आल्हाट, अभिजित साबळे, प्रवीण जळगावकर, संदीप वायदंडे, जावेद तांबोळी, समीर पवार, सुरेश परदेशी, पुष्पराज गायकवाड, अभिजित नगरकर, उमेश गाडेकर, अजित दरवडे, सउद सुंडके आदी कर्मचारी उपस्थित होते. मार्केट यार्ड आगारामध्ये २१७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

B.G. कोळसे-पाटलांचा सवाल; म्हणाले – ‘त्यावेळी संभाजी छत्रपतींनी संसदेत तोंड का उघडले नाही ?’

आमदार माधुरी मिसाळ, आमदार सुनील कांबळे, विरोधी पक्षनेता नगरसेवक रवींद्र धंगेकर, नगरसेवक मानसी देशपांडे, राजश्री अविनाश शिळमकर, माजी नगरसेवक अभय छाजेड, स्वीकृत नगरसेवक रमेश बिबवे यांनी रक्तदान शिबिराला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

श्रीनाथ भिमाले म्हणाले की, पीएमपी माझी आहे या भावनेतून शहराचे काही देणे लागतो, त्या भावनेतून कामगारांनी रक्तदान करून नवी वाट निर्माण केली आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने पीएमपीचे कामकाज सुरू ठेवले आहेत. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून सर्व कामगारांना एकत्र राहण्याचा उत्तम संदेश दिला आहे. मागिल वर्षभरापासून कोरोना महामारीमुळे कामगार हतबल झाला होता. त्यांना उर्जा देण्याचे काम सीएमडी जगताप यांनी केले आहे नवीन आगार, कामगारांचे हित, कामगारांसाठी विमा अशा विविध योजना त्यांनी पीएमपीसाठी राबवून चांगला संदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.

वारंवार लघवीला येत असेल तर करा ‘ हे ‘ उपाय

पीएमपीच्या शेवाळेवाडी-भेकराईनगर आगारामध्येही रक्तदान शिबिर घेण्यात आले. दोन्ही आगारातील ४०० रक्तदात्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी आगार व्यवस्थापक सोमनाथ वाघुले, डीएमई सचिन राजापुरे, वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, किसनराव जाधव, शौकतभाई शेख, वर्षा मोडक, आकाशनी सूर्यवंशी, सुनील बालगुडे, प्रमोद जेधे, सिद्धू कवडगावे, बापू शेवते, महादेव पोमण, संजू पवार, अरुण धुमाळ, नितीन चांदगुडे, सुरेश पवार, कालिदास नाले, जिम्मा शेख, संपत कोते, दत्तात्रय थोरात, अभिमन्यू खंदारे, प्रल्हाद सोनवलकर, राजेंद्र जाधव, मुरलीधर सोनवलकर यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार संजय जगताप, नगरसेवक उज्ज्वला जंगले, मारुतीआबा तुपे, गणेश ढोरे, संजय हरपळे आदी मान्यवरांनी भेट देऊन रक्तदात्यांची विचारपूस करून शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, आमदार संजय जगताप म्हणाले की, पीएमपीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी काळाची गरज ओळखून मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिराच्या माध्यमातून चांगली दिशा दिली आहे. कोरोना महामारीमध्ये अनेक खचून न जाता पीएमपी आपले कुटुंब आहे, या भावनेतून प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला आहे. पीएमपीच्या प्रत्येक आगारामधील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करण्यात सहभाग घेतला आहे, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Also Read This : 

दलित समाजाबद्दल जातीवाचक वक्तव्य; ‘तारक मेहता’ फेम अभिनेत्रीवर FIR

Video : पुण्यात नाकाबंदीमध्ये ट्रॅफिक पोलिसानं दुचाकी थांबवली ! दुचाकीस्वारानं फरफटत नेल्यानं पोलिस हवालदार जखमी; व्हिडीओ CCTV मध्ये कैद

राज्यातील ‘या’ 21 जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट जास्त; 15 दिवसांचा ‘लॉकडाऊन’ वाढणार