Pune PMPML Bus | पुणेकरांसाठी खुशखबर ! पुण्यातील ‘या’ 5 मार्गावर आजपासून पीएमपीएमएलची रातराणी सेवा सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMPML Bus | पीएमपीएमएलने प्रवास करणार्‍यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) अचानकपणे बंद केलेली रातराणी बस सेवा पुन्हा आज (दि. 8 जून 2023) पासून सुरू केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर ही सेवा 5 मार्गावर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Pune PMPML Bus)

 

अचानकपणे पीएमपीएमएलने रातराणी बस सेवा बंद केल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत होते. पीएमपीएमएलचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया (IAS Om Prakash Bakoria) यांनी गुरूवारपासुन रातराणी सेवा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. पहिल्या टप्प्यात शहरातील 5 मार्गांवर प्रत्येक एका बसच्या माध्यमातून ही बस सेवा सुरू करण्यात येत आहे. प्रवासासाठी मूळ तिकिटापेक्षा 5 रूपये जादा आकारले जाणार आहेत. एका तासाच्या फरकाने ही सेवा सुरू राहणार आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून बसच्या संख्येत वाढ करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. (Pune PMPML Bus)

 

रातराणी बसचे सुरू केलेले मार्ग पुढील प्रमाणे आहेत.

1. कात्रज ते वाकडेवाडी स्टॅन्ड Katraj To Wakdewadi Stand (मार्ग – स्वारगेट, शनिपार, मनपा भवन – Shanipar- Mahapalika Bhavan Pune)

2. कात्रज ते पुणे स्टेशन Katraj To Pune Station (मार्ग – स्वारगेट, नाना पेठ, रास्ता पेठ – Nana Peth – Rasta Peth)

3. हडपसर ते स्वारगेट Hadapsar To Swargate (मार्ग – वैदूवाडी, रामटेकडी, पुलगेट – Vaiduvadi, Ramtekdi, Pulgate)

4. हडपसर ते पुणे स्टेशन Hadapsar To Pune Station
( मार्ग – पुलगेट, बॉम्बे गॅरेज, वेस्टएन्ड टॉकीज – Bombay Garage, Westend Cinema)

5. पुणे स्टेशन ते एनडीए गेट Pune Station To NDA Gate
(मार्ग – नाना पेठ, लक्ष्मी रोड, डेक्कन कॉर्नर – Laxmi Road, Deccan Corner )

 

टीप – रात्री 11.30 पासून ते पहाटे 5.30 वाजेपर्यंत काही बस या दर तासांनी उपलब्ध असणार आहेत तर काही बसची वारंवारिता
दर दीड तासांनी निश्चित केली गेलेली आहे. पीएमपीएमएलने प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या प्रतिसादानुसार त्यामध्ये बदल होणार आहे.

 

Web Title :  Pune PMPML Bus | Good news for Pune residents! Night service of PMPML on 5 route in Pune from today

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा