Pune : सिंहगड रोडवर भरधाव पीएमपी बसची दुचाकीस्वारास धडक, डोक्यावरून चाक गेल्याने सुरक्षारक्षकाचा जागीच मृत्यू

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – भरधाव पीएमटी बसने दिलेल्या धडकेत एका दुचाकीस्वार जेष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भयंकर होता की पाहणाऱ्याच्या अंगावर शहारे उभा राहीले होते. पुण्यातील सिंहगड रोडवर माणिकबाग येथे ही घटना घडली आहे. रविवारी सकाळी हा प्रकार घडल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गर्दी कमी केली.

जयंत रामाजी महाडिक (वय 67, नर्‍हे) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयंत हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. दरम्यान, ते नर्‍हेत रहात होते. सकाळी ते त्यांच्या दुचाकीवरुन घरी जात होते. याच वेळी स्वारगेट ते नर्‍हे ही पीएमपी बस स्वारगेटकडून नर्‍हेकडे जात होती. यावेळी माणिकबाग येथील जगताप हॉस्पिटलच्या समोर बसने जयंत यांना धडक दिली. यावेळी त्यांच्या डोक्यावरून बसचे चाक गेले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी सहसा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे अपघात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.

You might also like