Pune PMPML Bus | पीएमपीची निगडी-लोणावळा बससेवा बंद; आणखी 40 मार्गांवरील बस बंदचे नियोजन  

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एसटी कर्मचाऱ्यांच्या संपकाळात पीएमपी (Pune PMPML Bus) प्रशासनाने ग्रामीण भागात आपली सेवा सुरू केली होती. मात्र, एसटीचा संप संपला तरी ही सेवा सुरू असल्याने एसटी प्रशासनाकडून पीएमपीला (Pune PMPML Bus) पत्र देण्यात आले होते. पीएमपीने या पत्राची दखल घेत शहराबाहेरील ग्रामीण 11 मार्गांसह निगडी-लोणावळ्याचा 12 वा मार्गदेखील बंद केला आहे. याशिवाय आणखी 40 मार्ग बंद करण्याचे नियोजन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

एसटी संपकाळात पीएमपीने (Pune PMPML Bus) ग्रामीण भागात सुरू केलेली आपली सेवा संप मिटल्यानंतर तशीच सुरू ठेवली होती. याबाबत एसटी प्रशासनाने तत्कालीन पीएमपीचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा यांना ही सेवा बंद करण्याची मागणी करणारी अनेक पत्रं पाठवली होती. मात्र, याची दखल पीएमपी प्रशासनाने घेतली नाही, परंतु आता पीएमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी एसटी प्रशासनाच्या पत्राची दखल घेतली आहे.

 

बकोरिया यांनी तात्काळ ग्रामीण भागातील पीएमपीच्या सेवा बंद केल्या आहेत. ग्रामीण भागातील आणखी 40 मार्गांवरील पीएमपीची सेवा बंद होणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 11 मार्गांवरील पीएमपीची सेवा बंद केली आहे. त्यात आणखी एका मार्गाची भर घालून ग्रामीण भागातील 12 वा मार्ग बंद केला आहे. बारावा मार्ग निगडी ते लोणावळा हा होता.

नियमानुसार पीएमपीची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही शहरापुरतीच मर्यादित आहे,
तर एसटीची सेवा संपूर्ण राज्यात पुरवली जाते.
पीएमपीला हद्दीबाहेर सेवा पुरवायची असेल तर एसटी प्रशासनाची परवानगी घेणे अनिवार्य आहे.
मात्र, एसटीच्या संपकाळात पीएमपीने कोणतीही परवानगी न घेता ग्रामीण मार्गावर पीएमपी सेवा सुरू केली होती.
यामुळे एसटीच्या उत्पन्नावर याचा मोठा परिणाम झाला आहे.

 

Web Title :- Pune PMPML Bus | nigdi lonavala pmp shut down by pmpml pimpri chinchwad pune news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Power Supply Off | शिवाजीनगर आणि डेक्कन परिसरात उद्या (रविवार) सकाळी ‘या’ वेळेत होणार बत्ती गूल

Raj Thackeray | ‘राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरू; पण माझा महाराष्ट्र सैनिक…’ – राज ठाकरे

Bharosa Cell Pune | पती-पत्नीमध्ये दुरावा वाढतोय; दर अडीच तासाला भरोसा सेलमध्ये एक तक्रार दाखल

Railway IRME Exam-UPSC | केंद्रीय लोकसेवा आयोगावर मोठी जबाबदारी; आयोजित करणार रेल्वे भरतीच्या ‘या’ परीक्षा