Pune PMPML Bus | …म्हणून ‘या’ 13 मार्गावरील PMPML बस सेवा बंद ! पीएमपीचा मोठा निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMPML Bus | एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे (ST Workers Strike) पुणे ग्रामीण (Pune Rural) मधील नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी PMPML ची बस सेवा सुरु करण्यात आली होती. मात्र, आता एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यामुळे पीएमपीने ग्रामीण भागात सुरु केलेली 13 मार्गावरील बस सेवा (PMPML Bus Service) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे आदेश नुकतेच पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा (IAS Laxminarayan Mishra) यांनी दिले आहेत. (Pune PMPML Bus)

 

पीएमपीने (PMP) एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर 13 मार्गावर बस सेवा सुरु केली होती. हे मार्ग बंद करण्यासाठी एसटी महामंडळाने अनेकवेळा पीएमपी प्रशासनाला पत्र पाठवले होते. परंतु पीएमपी आणि एसटी महामंडळ यांच्यात तू तू मै मै सुरु होते. विनाकारण दोन सार्वजनिक वाहतूक पुरवणाऱ्या संस्थांमध्ये होणारी स्पर्धा थांबवण्यासाठी पीएमपीने एक पाऊल मागे घेतले आहे. एसटी संप काळात सुरु केलेले सर्व मार्गावरील बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पीएमआरडीएच्या (PMRDA) हद्दीबाहेरील 13 मार्ग बंद होणार आहेत. (Pune PMPML Bus)

 

बंद होणारे 13 मार्ग

1. पुणे – निरा (Pune – Nira)
2. भोसरी – जुन्नर (Bhosari – Junnar)
3. चाकण – शिक्रापूर (Chakan – Shikrapur)
4. हडपसर – यवत (Hadapsar – Yavat)
5. स्वारगेट – वेल्हा (Swargate – Velha)
6. भोसरी – मंचर – घोडेगाव (Bhosari – Manchar – Ghodegaon)
7. वाघोली – रांजणगाव (Wagholi – Ranjangaon)
8. सासवड – जेजुरी (Saswad – Jejuri)
9. कात्रज – सारोळा (Katraj – sarola)
10. सासवड – वीर (Saswad – Veer)
11. स्वारगेट – पानशेत (Swargate – Panshet)
12. स्वारगेट – खारवडे (Swargate – Kharwade)
13. वाघोली – राहू (Wagholi – Rahu)

 

 

Web Title :- Pune PMPML Bus | PMPML closes 13 roads in rural areas decision due to commencement of st bus service IAS Laxminarayan Mishra

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा