Pune PMPML Bus | कोड स्कॅन करा अन् तिकीट मिळवा; ‘पीएमपीची नवी सुविधा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पीएमपीनेही (Pune PMPML Bus) आपल्या ग्राहकांसाठी डिजिटल पैशांची आणि तिकिटाची सोय केली आहे. शहरात येणाऱ्या पर्यटकांना आणि पुणेकरांना प्रेक्षणीय स्थळांची सफर घडविणाऱ्या ‘पुणे दर्शन’ सेवेत क्यूआर कोडद्वारे तिकीट शुल्क आकारण्यास सुरुवात झाली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास पीएमपीच्या सर्व बसमध्ये या नव्या पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे महानगर परिवहन मंडळ लिमिटेडने दिली आहे. (Pune PMPML Bus)

 

तिकिटाच्या सुट्ट्या पैशांमुळे अनेकदा बसमध्ये वाहक आणि प्रवासी यांच्यात वाद होतात. हे वाद टाळण्यासाठी ऑनलाइन पेमेंट सुविधा उपयुक्त आहे. सध्या चहावाल्यापासून अगदी ज्वेलर्सपर्यंत सगळीकडे ऑनलाइन पेमेंट सुविधा पुरविल्या जातात. त्यामुळे पीएमपीने तरी मागे का राहावे? या पार्श्वभूमीवर पीएमपीचे नवनिर्वाचित व्यवस्थापक संचालक ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे अनेक नागरिकांनी ऑनलाइन पेमेंट सुरू करण्याची विनंती केली होती. त्यानुसार त्यांन ही सुविधा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. (Pune PMPML Bus)

 

सध्या बसमध्ये क्‍यूआर कोड लावण्यात आले असून,
प्रवाशांना तो स्कॅन करून ‘गुगल पे’ किंवा ‘फोन पे’द्वारे तिकिटाचे पैसे जमा करता येतील.
पैसे मिळाल्याचा संदेश पाहून वाहक त्यांना तिकीट देईल. त्यामुळे आता गुगल पे आणि फोन पे बसमध्येदेखील चालणार आहे.
पुणे दर्शनच्या बसमध्ये ऑनलाइन पेमेंटची सुविधा यशस्वी झाल्यास पीएमपीच्या सर्वच बसमध्ये पुढील पंधरा दिवसांमध्ये ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे.
या सेवेमुळे नागरिकांना दिलासा मिळणार असून, बसमध्ये सुट्ट्या पैशांसाठी वाहकांबरोबर होणारे वादही कमी होणार आहेत.

 

Web Title :- Pune PMPML Bus | scan code and get ticket facility in pmp bus pune pmpml bus

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Power Supply Off | शिवाजीनगर आणि डेक्कन परिसरात उद्या (रविवार) सकाळी ‘या’ वेळेत होणार बत्ती गूल

Raj Thackeray | ‘राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरू; पण माझा महाराष्ट्र सैनिक…’ – राज ठाकरे

Bharosa Cell Pune | पती-पत्नीमध्ये दुरावा वाढतोय; दर अडीच तासाला भरोसा सेलमध्ये एक तक्रार दाखल

Railway IRME Exam-UPSC | केंद्रीय लोकसेवा आयोगावर मोठी जबाबदारी; आयोजित करणार रेल्वे भरतीच्या ‘या’ परीक्षा