Pune PMPML Employees | पीएमपीएमएल कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू झाल्यास….

पीएमपीएमएल प्रशासन ‘आकडेमोडी’च्या कामाला लागले

 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMPML Employees | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पीएमपीएमएल कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) वेतनश्रेणी लागू करण्याबाबतचे सुतोवाच केल्यानंतर पीएमपीएमएल प्रशासन ‘आकडेमोडी’ च्या कामाला लागले आहे. यासंदर्भात लवकरच बैठक घेण्यात येईल, अशी माहिती पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनाराण मिश्रा (IAS Laxminarayan Mishra) यांनी दिली. (Pune PMPML Employees )

 

पीएमपीएमएलच्या ताफ्यात नुकतेच १५० ई बसेसचा समावेश करण्यासोबतच पुणे स्टेशन येथील चार्जिंग स्टेशनचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ऑनलाईन उपस्थित लावलेले मुख्यमंत्री शिंदे यांनी पीएमपीएमएलचे अधिकारी व कर्मचार्‍यांना महापालिकेप्रमाणेच सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत दोन्ही महापालिकांचे आयुक्त, पीएमपीएमएलचे संचालक आणि पीएमआरडीएचे आयुक्त यांच्यासोबत लवकरच बैठक घेण्याची घोषणा केली. या घोषणेचे कामगार संघटनांनी स्वागत केले असून शासन केंव्हा निर्णय घेणार? याबाबत कर्मचार्‍यांची उत्सुकता वाढली आहे. (Pune PMPML Employees)

यासंदर्भात पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार लवकरच दोन्ही महापालिका आयुक्त, पीएमआरडीए आयुक्तांसोबत बैठक घेण्यात येणार आहे. पीएमपीएमएलकडील कायम कर्मचारी, त्यांना केंव्हापासून सातवा वेतन आयोग लागू करायचा, सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर वाढणारा व्यवस्थापकीय खर्च, पीएमपीची सध्याची आर्थिक परिस्थिती, महापालिकांकडून मिळणारी आर्थिक मदत या सर्वबाबींवर चर्चा करून मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल. यासाठीची प्राथमिक तयारी पीएमपीने सुरू केली आहे.

 

Web Title :- Pune PMPML Employees | If the 7th Pay Commission is implemented for PMPML employees

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा