Pune PMPML | पीएमपीएमएलची सेवा भविष्यात खंडित होऊ न देण्याचा पालकमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMPML | पुणे शहर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील प्रमुख असलेल्या पीएमपीएमएलची वाहतूक व्यवस्था भविष्यात खंडित होणार नाही याची पीएमपीएमएल प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिले. (Pune PMPML)

 

पीएमपीएमएलच्या चार ठेकेदारांकडून काही दिवसांपूर्वी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्री. पाटील यांच्या निवासस्थानी शहर बससेवेबाबत पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन, पीएमपीएमएल प्रशासन आणि ठेकेदारांसमवेत बैठक घेण्यात आली. (Pune PMPML)

 

या बैठकीला आमदार सिद्धार्थ शिरोळे (MLA Siddharth Shirole) , पीएमपीएमएलचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया (IAS Om Prakash Bakoria), पुणे महापालिका आयुक्त डॉ. विक्रम कुमार (IAS Vikram Kumar), पिंपरी-चिंचवडचे आयुक्त शेखर सिंह (Shekhar Singh), PMRDAचे आयुक्त राहुल रंजन महिवाल (Rahul Ranjan Mahiwal), पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी राजेंद्र मुठे (Rajendra Muthe) यांच्यासह पीएमपीएमएलचे प्रमुख ठेकेदार (PMPML Contractors) उपस्थित होते.

 

पुणे देशातील जलदगतीने विकसीत होणारे शहर असून, वास्तव्यासाठीदेखील सर्वाधिक पसंतीचे शहर आहे. त्यामुळे शहराची लोकसंख्या पाहता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पीएमपीएमएलवर अवलंबून आहे. सर्वाधिक पुणेकर पीएमपीएमएलच्या बसेसमधून प्रवास करतात.

 

पीएमपीएमएलच्या ठेकेदारांचे गेल्या तीन महिन्यांचे देयक न मिळाल्याने काही दिवसांपूर्वी पीएमपीएमएलच्या ठेकेदारांकडून अचानक संप पुकारण्यात आला होता.
या संपाचा विद्यार्थी, नोकरदारांसह प्रवाशांना फटका बसला. त्यानंतर तातडीने पालकमंत्री पाटील यांनी मध्यस्थी करून तातडीने हा संप मिटवला.
त्यावेळी पीएमपीएमएलकडून ठेकेदारांना ६६ कोटी रुपये देण्यात आले.

 

उर्वरित देयक आणि पुढील धोरण निश्चितीसाठी आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
जानेवारी पर्यंतची तूट मार्च अखेरपर्यंत द्यावी, तसेच फेब्रुवारी आणि मार्चचे देयक १५ एप्रिलपर्यंत द्यावे
अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पीएमपीएमएलच्या आयुक्तांना आयुक्त दिल्या.

 

भविष्यात पीएमपीएमएलकडून दर महिन्याला देयक अदा केले जाईल याची दक्षता घेण्याबाबत सूचना दिल्या.
त्यावर पीएमपीएमएलच्या ठेकेदारांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी संबंधित सर्वांनीच संवेदनशीलता दाखवावी व बससेवा अखंडित आणि सुरळीत राहील याबाबत आवश्यक नियोजन करावे.
प्रवाशांना चांगली सेवा मिळेल यासाठी आवश्यक उपाय करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.

 

Web Title :- Pune PMPML | It was decided in the meeting of the Guardian Minister not to allow the service of PMPML to be interrupted in the future

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

IND vs AUS | ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक करून विराट कोहलीने केला ‘हा’ विक्रम; अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा फलंदाज

Vinay Aranha In ED Custody | विद्यार्थ्यांकडून भरमसाट फी घेणार्‍या विनय अरान्हाने उधळले बॉलीवूड स्टारवर पैसे; अनेक कारनामे ‘बाहेर’

Devendra Fadnavis | नैसर्गिक आणि गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याना संपन्न करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस