Pune PMPML News | बाजीराव आणि शिवाजी रस्त्यावरील 7 बससेवा पुर्ववत; विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पीएमपीएमएलचा निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMPML News | विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरीक प्रवाश्यांची गैरसोय टाळण्यासाठी पीएमपीएमएलने बाजीराव रस्ता (Bajirao Raod) आणि शिवाजी रस्त्यावरील (Shivaji Raod) सात बससेवा पुर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार ( ता. ४ ) पासून ही सेवा पुर्ववत होईल अशी माहीती पीएमपीएलने कळविली आहे. (Pune PMPML News)

 

कात्रज ते शिवाजीनगर (बस क्रमांक २ अ), २० सहकारनगर ते संगमवाडी ( बस क्रमांक २०), स्वारगेट ते सांगवी ( बस क्रमांक २१), ३० मार्केटयार्ड ते घोटावडे फाटा ( बस क्रमांक ३०) नतावाडी ते सहकारनगर ( बस क्रमांक ३७), ६८ अप्परडेपो ते सुतारदरा ( बस क्रमांक ६८), मार्केटयार्ड ते पिंपरीगाव ( बस क्रमांक ३५४ ) या मार्गावरील बसेस पुर्वीप्रमाणेच बाजीराव रस्ता आणि शिवाजी रस्त्यावरून जातील. शहराच्या मध्यवर्ती भागात असणार्‍या या दोन्ही रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने पीएमपीएलने जुलै महीन्यात सदर सात मार्गावरील बसेसचा मार्ग बदलला होता. (Pune PMPML News)

 

बाजीराव रस्त्याने जाणार्‍या बसेस जाताना दांडेकर पूल, शास्त्री रोड, फर्ग्युसन कॉलेजरोड मार्गे व
शिवाजी रस्त्याने येणार्‍या बसेस येताना जंगली महाराज रोडने डेक्कन टिळक रोड मार्गे असा बदल गेला होता.
यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक व प्रवाशी नागरिक यांची गैरसोय होऊ लागली होती.
ती दुर करण्यासाठी या सात मार्गावरील बसेस पुर्वीप्रमाणेच बाजीराव रस्ता आणि शिवाजी रस्त्यावरून जाणार आहेत.

 

Web Title :- Pune PMPML News | 7 bus services on Bajirao and Shivaji Roads; PMPML’s decision to avoid inconvenience to students and senior citizens

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Cabinet Meeting | रवी राणांसोबतचा वाद मिटताच बच्चू कडूंना शिंदे-फडणवीसांकडून मोठं गिफ्ट

Sambhaji Bhide | संभाजी भिडे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, म्हणाले-‘राम लक्ष्मण एकत्र आले पाहिजेत’

Abdul Sattar | ‘माझ्या मतदारसंघात दोन नंबरचे पप्पू…’, अब्दुल सत्तारांचा आदित्य ठाकरेंना टोला