Pune Police | रिक्षात विसरली 3 लाखाची रोकड व 55 हजारांच्या साड्या; डेक्कन पोलिसांनी घेतला तात्काळ शोध

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लग्नाची खरेदी करण्यासाठी पुण्यात आलेल्या एका कुटुंबाची तीन लाख रुपयांची रोकड असलेली बॅग आणि 55 हजारांच्या साड्यांची बॅग रिक्षात विसरली (forgotten in the rickshaw). खरेदी केलेले सामान आणि रोख रक्कम गेल्याने कुटुंबाने डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station)  धाव घेतली. पोलिसांना (Pune Police) सर्व हकीकत सांगितल्यानंतर डेक्कन पोलिसांनी (Pune Police) तात्काळ रिक्षा चालकाचा शोध घेऊन रिक्षात विसरलेले सामान आणि रोख रक्कम कुटुंबाच्या स्वाधिन केले.

 

विश्वजीत दिलीपराव पवार आणि त्यांचे मित्र पंकज माणिकराव जमदाडे (रा. मणेराजुरी ता. तासगाव, जि. सांगली) हे लग्नाचे कपडे खरेदी करण्यासाठी रविवारी (दि.17) पुण्यात आले होते. खरेदी केल्यानंतर जंगली महाराज रोड येथील हॉटेल शिवसागर येथे कुटुंबासोबत नाष्टा करण्यासाठी थांबले होते. हॉटेलमध्ये जाताना त्यांची तीन लाख रुपये  (three lakh cash)असलेली पैशाची बॅग आणि 55 हजार रुपयांच्या साड्यांची बॅग (Saree bag) रिक्षात विसरली.

 

विश्वजीत पवार यांनी रात्री 8 वाजात त्यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसाकडे (Pune Police) तक्रार देली. डेक्कन पोलिस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस अंमलदार दादासाहेब बर्डे (Dadasaheb Barde) व महेश तांबे (Mahesh Tambe) यांनी डेक्कन आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या (Vishrambag Police Station) हद्दीतील सीसीटीव्ही फुटेज तपासून रिक्षाचा क्रमांक मिळवला. नाकाबंदी अ‍ॅप वरुन रिक्षाचालकाचे नाव व पत्ता घेतला असता रिक्षा चालक सुदेश घोलप (रा. गणेश मंदिर, घोरपडी बाजार) असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी तात्काळ रिक्षा चालक राहत असलेल्या ठिकाणी जाऊन सुदेश घोलप यांच्याकडून रिक्षात विसरलेल्या साड्या व रोख रक्कम ताब्यात घेतली.
हे सर्व सामान डेक्कन पोलीस ठाण्यात आणून रात्रगस्त अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक पावसे (API Pawse) यांच्याहस्ते तक्रारदार यांच्याकडे देण्यात आले.

 

Web Title :- Pune Police | 3 lakh cash and 55 thousand sarees forgotten in the rickshaw; Deccan police conducted an immediate search

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Russia Suspends Its Mission To NATO | रशियानं बंद केलं नाटोचं मिशन, NATO चं मॉस्कोमधील इनफॉर्मेशन ऑफिस होणार बंद !

Gold Price Today | सणासुदीच्या काळात वाढला सोन्याचा दर, तरीसुद्धा मिळतेय 9894 रुपयांनी ‘स्वस्त’, जाणून घ्या 1 तोळ्याचा नवीन दर

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 2,078 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी