पुण्यातील ‘या’ ८ ‘पब्ज्’वर पोलिसांची ‘कडक’ कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मोठमोठ्याने गाणी वाजवून सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या व रात्री ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ सुरु असलेल्या ८ पब्ज् वर गुन्हे शाखेच्या युनीट ५ च्या पथकाने कारवाई केली आहे.

पुण्यातील मुंढवा आणि हडपसर भागात असलेल्या ८ पब आणि हॉटेलवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३३(क्ष) सह १३१/१३४ प्रमाणे कारवाई कऱण्यात आली आहे.

या हॉटेल्स / पब्ज् वर केली कारवाई

मुंढवा
द हाऊ ऑफ मेडीची, हॉटेल वेस्टीन, हॉटेल पेन्ट हाऊस, हॉटेल क्लब अलेरो, हॉटेल मेट्रो, हॉटेल अन वाईंड, हॉटेल हेफ एनएन लाऊंज,

हडपसर
हॉटेल प्ले बॉय, हॉटेल क्युबा लिबरे

हा कारवाई अप्पर पोलीस आय़ुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आय़ुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली युनीट पाचचे प्रभारी पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे, कर्मचारी प्रदिप सुर्वे, राजेश रणसिंग, दत्ता काटम, केरवा गलांडे, अमजद पठाण, सचिन घोलप, प्रमोद घाडगे, दया शेगर, प्रमोद गायकवाड, अंकुश जोगदंडे, महेश वाघमारे, प्रविण काळभोर, संजयकुमार दळवी यांच्या पथकाने केली.

आरोग्य विषयक वृत्त-
घरगुती पद्धतीने ‘वजन’ करा झटपट कमी
अपचनाच्या समस्येसाठी ‘वज्रासन’ फायद्याचे
केळीच्या सालीचे उपाय चकित करणारे, जाणून घ्या फायदे

You might also like