Pune Police | पुण्यातील पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित

पुणे : Pune Police | एका अर्जाच्या चौकशीबाबत गंभीर बाब समोर आल्याने एक पोलीस उपनिरीक्षक (PSI) आणि पोलीस नाईक यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. अप्पर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर (Addl CP Dr. Jalindar Supekar) यांनी हा निलंबनाचा आदेश (Pune Police) काढला आहे.

पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे (PSI Santosh Sonavane) आणि पोलीस नाईक ज्ञानेश्वर पालवे अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी करण्यात येत होती. त्यात ते प्रथमदर्शनी दोषी आढळून आल्याने त्यांना निलंबित (PSI Suspended) करण्यात आले आहे.

संतोष सोनवणे हे नियंत्रण कक्ष (Pune Police Control Room) येथे सध्या नियुक्तीला होते. तर, ज्ञानेश्वर पालवे हे विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) नियुक्तीला होते. एका अर्ज चौकशी प्रकरणात प्रथमदर्शनी त्यांच्याविरुद्ध गंभीर बाबी निष्पन्न झाल्या आहेत. त्यामध्ये त्यांचे नैतिक अंध:पतन व गुन्हेगारी स्वरुपाचे कृत्य केल्याचे व संबंधित अर्जदारावर दबाव आणण्याचा प्रयत्न केलेल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे  त्यांना 30 सप्टेंबरपासून निलंबित (Pune Police) करण्यात आले आहे.

हे देखील वाचा

Petrol Diesel Price Today | झटका ! आज पुन्हा वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीन दर

सर्वसामान्यांना मोठा झटका ! नॅचरल गॅसच्या किमतीत तब्बल 62 टक्क्यांनी वाढ, महागणार CNG गॅस

Pune Crime | पुण्याच्या फुरसुंगीमध्ये मित्राने मित्राच्या अंगावर पेट्रोल टाकून ‘जिवंत’ जाळलं; हडपसरमध्ये खुनाचा गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Police | addl cp dr. Jalindar Supekar Suspended psi santosh sonavane (control room) and police dnyaneshwar palve of vishrantwadi police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update