Pune Police API Suspended | पुण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षकासह पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण

पुणे : Pune Police API Suspended | कोणती परवानगी न घेता मोक्कातील आरोपीला लॉकअ‍ॅप बाहेर काढून घरझडतीसाठी घेऊन जाऊन आरोपी पलायन करण्यास मदत केल्याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षकासह पोलीस कर्मचार्‍याला सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Jt CP Sandeep Karnik) यांनी निलंबित केले आहे. (Pune Police API Suspended)

सहायक पोलीस निरीक्षक रामदास झुंबर मुंढे (API Ramdas Zumber Mundhe) आणि पोलीस नाईक महेश राजेंद्र जाधव (Police Naik Mahesh Rajendra Jadhav) अशी त्यांची नावे आहेत. मार्केट यार्ड येथील आंगडियाच्या कार्यालयात शिरुन अविनाश गुप्ता याच्या टोळीने (Avinash Gupta Gang) गोळीबार करीत तब्बल २८ लाख रुपये लुटून नेले होते (Firing In Market Yard Pune). याप्रकरणी पोलिसांनी गुप्ता याच्या टोळीला अटक केली. त्यांच्यावर पोलीस आयुक्त रितेशकुमार (CP Retesh Kumaarr) यांनी गेल्या महिन्यात मोक्का कारवाई MCOCA (Mokka Action) केली होती.

त्याचा तपास वानवडी विभागाच्या सहायक पोलीस आयुक्तांकडे देण्यात आला होता.
असे असताना रामदास मुंढे व महेश जाधव यांनी यातील ९ आरोपींपैकी संतोष पवार व साई कुंभार यांना कोणतीही
परवानगी न घेता पोलीस कोठडीतून बाहेर काढले.
त्याला घर झडतीसाठी खानापूर येथे घेऊन येत असल्याचे साई कुंभार याचा मित्र राकेश नवसरे याला मोबाईलवरुन
सांगितले. कोणताही पुरेसा पोलीस बंदोबस्त न घेता दोघांना खानापूरला घेऊन गेले.
त्यातून संतोष पवार हा पळून गेला.
आरोपी पळून जाण्यास पोलिसी कर्तव्यात बेजबाबदार व बेफिकीर गैरवर्तन कारणीभूत ठरल्याने
सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी दोघांना निलंबित केले आहे.

Web Title :- Pune Police API Suspended | API Ramdas Mundhe And Police Naik Mahesh Jadhav Suspended

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Anurag Kashyap | ‘सेक्रेड गेम्स 3’ येणार नाही; अनुराग कश्यप यांचे मोठे वक्तव्य

Poonam Pandey | अभिनेत्री पूनम पांडेने घेतला मोठा निर्णय; म्हणाली – ‘मी यापुढे…’