पुण्यात हौसिंग सोसायटी अध्यक्ष आणि सचिव यांची विशेष पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती, जाणून घ्या

पुणे  :  पोलीसनामा ऑनलाइन  –  कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यात येत असून, या काळात पोलिसांचे मनुष्यवळ कमी पडत असल्याने आता हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांना विशेष पोलिस अधिकारी (एसपीओ) म्हणून नियुक्ती दिली जाणार आहे. शहरात गरजेनुसार त्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. याकाळात पोलीस यंत्रणेवर ताण पडत आहे. त्यामुळे राज्यातील महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ मध्ये आयुक्तालयात विशेष पोलिस अधिकारी नेमण्याचे अधिकार पोलिस आयुक्त आणि जिल्ह्यात पोलिस अधीक्षकांना आहेत.

पुण्यातील अनेक भाग पूर्णपणे सील केले आहेत. नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई आहे. पण अनेकजण विनाकारण बाहेर पडत आहेत. पोलीस कारवाई करत आहेत.

पण सर्व ठिकाणी पोलीस पोहचू शकत नाहीत. पोलिस मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी आता सोसायटीचे अध्यक्ष व सचिव अथवा त्यांनी सांगितलेले व्यक्तीला विशेष पोलिस अधिकारी म्हणून नियुक्त केले जाणार आहे. त्यांना देखील पोलिसाचे अधिकार मिळणार आहेत. या विशेष पोलिस अधिकाऱ्यांना कामांचे वाटप करण्यात येणार आहे. सोसायटी संदर्भातील काम करणार आहेत. मात्र, त्यांनी विशेष पोलिस अधिकारी म्हणून दिलेल्या प्रमाणपत्राचा गैरवापर केल्यास हे पद रद्द केले जाईल.

–चौकट–

विशेष पोलीस होण्यासाठी हे आहेत निकष

विशेष पोलिस अधिकाऱ्यासाठी साधारण १८ ते ५० वयाची अट आहे. तर ती व्यक्ती राजयकी पक्ष, संघटनाशी संबंधित नसावी. त्या व्यक्तीस मधुमेह, रक्कदाब असे आजार नसावेत. त्या व्यक्तीवर गुन्हे दाखल नसावेत. विशेष पोलिस अधिकारी होण्यासाठी संबंधित व्यक्तीला पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षकांकडे मेल अथवा प्रत्यक्ष द्यावा. त्यानंतर त्याला विशेष पोलिस अधिकाऱ्याचा बॅच मिळेल. सर्व गोष्टींवर उपायुक्त व इतर वरिष्ठ अधिकारी देखरेख ठेवतील.

—चौकट—

विशेष पोलिस अधिकाऱ्यांनी (एसपीओ) प्रमाणपत्र सोबत बाळगावे. विचारणा केल्यास दाखवावे.

–  एसपीओनी सोसायटीतील सदस्यांचा व्हॉट्स अप ग्रुप तयार करून शासनाच्या अधिसूचना, शासन निर्णय त्यांना अवगत करून द्यावेत.

   पुणे महापालिकेच्या मदतीने सोसायटीचा परिसर साफ सफाई व निर्जंतुकीकरण फवारणी करून घ्यावी.

   सोसायटीच्या आवारात गर्दी होणार नाही याची काळजी घेऊन भाजीपाला खरेदीची व्यवस्था करावी.

   आठवड्याचा किरणा माल, वैद्यकीय औषधे याचे पार्सल एकाचवेळी मागवून सर्व सदस्यांना वितरणाची व्यवस्था करावी.

   बाहेरील जिल्हे व परदेशातून आलेल्या व्यक्तीची माहिती घेऊन त्याबाबत पोलिस ठाण्याला त्याची माहिती देतील. तसेच, त्या व्यक्तींना विनाकारण त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.

   होम क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींकडून उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी. असे उल्लंघन केल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी.