Pune : दोन चोरट्यांना पाठलाग करून पकडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पॅनकार्ड क्लब येथे एका इमारतीत ॲल्युमिनियमच्या फ्रेम चोरणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या साथीदारासह गस्तीवरील बीट मार्शल पोलिसांनी पकडले. याप्रकरणी प्रमोद हनुमंत मेघावत (वय २५, रा. पाषाण) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

तर, अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिस नाईक सारस साळवी यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर येथील पॅनकार्डक्लबमधील एका इमारतीच्या काचा फोडून ॲल्युमिनियमच्या फ्रेम चोरल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानंतर तत्काळ चतुःश्रुंगी पोलिसांच्या बीट मार्शलनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी दोघेजण पळून जात होते. पण, त्या दोघांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले. याप्रकरणी चतु:श्रुंगी अधिक तपास करत आहेत.