2 तडीपार गुन्हेगारांसह 3 गुन्हेगार हत्यारासह गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे. पुणे पोलिसांनी दोन तडीपार गुन्हेगारांसह तीन सराईत गुन्हेगारांना घातक शस्त्रासह अटक केली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट -3 च्या पथकाने केली आहे.

अजिंक्य सुरेश शिंदे (वय-22 रा. लोहीयानगर, पुणे), गंग्या उर्फ विक्की विष्णु आखाडे (वय-२२ रा. वारजे माळवाडी) असे अटक करण्यात आलेल्या तडीपार गुंडांची नावे आहेत. तर सोमनाथ नवनाथ अवघडे (वय-21 रा. काळेवाडी, कोथरुड) याला शस्त्रासह अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा युनिट-3 चे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी फरारी आणि तडीपार गुन्हेगारांचा शोध घेत होते. त्यावेळी अजिंक्य शिंदे हा रविवार पेठेतील पागा गणेश मंडळाजवळ अटक करण्यात आली. शिंदे याच्यावर स्वारगेट पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न तर खडक पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, विनयभंग, अंमली पदार्थ बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते.

सराईत गुन्हेगार सोमनाथ अवघडे याला काळेवाडी येथील बाल शिवाजी मित्र मंडळाजवळ अटक करण्यात आली. त्याच्यावर कोथरूड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असून त्याला शस्त्रासह अटक करण्यात आली आहे. तर विक्री आखाडे याच्यावर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असून त्याला एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. तडीपारीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त गुन्हे बच्चन सिंग, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट -३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस उप निरीक्षक संजय गायवाड, किरण अडागळे, हिमालय जोशी, पोलीस कर्मचारी प्रविण तापकीर, संदीप तळेकर, अतुल साठे, सचिन गायकवाड, विल्सन डिसोझा, रामदास गोणते, मच्छिंद्र वाळके, रोहिदास लवांडे, शकील शेख, राहुल घाडगे, दत्तात्रय गरुड, दिपक मते, संदीप राठोड यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त –