पुण्याच्या लक्ष्मी रस्त्यावरील व्यापारी चंदन शेवानी खून प्रकरणातील चौथ्या आरोपीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दोन कोटींच्या खंडणीसाठी लक्ष्मी रस्त्यावीर प्रसिद्ध शूज व्यापारी चंदन शेवानी (वय 48) यांच्या खूनातील फरार आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. यापुर्वी तिघांना अटक केली होती. तर, अद्याप मुख्या आरोपीसह दोघे पसार आहेत.

किरण सुनिल कदम (वय 21, रा. हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. यापुर्वी आफ्रीदी रौफ खान (वय 23, रा. नाना पेठ), सुनिल नामदेव गायकवाड (वय 49), अजिंक्य हनुमंत धुमाळ (वय 21, रा. सासवड) या तिघांना अटक केली होती. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

दोन महिन्यांपुर्वी दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी चंदन शेवाणी यांचे बंडगार्डन परिसरातून अपहरणकरून त्यांचा सातारा जिल्ह्यात नेहून गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या गुन्ह्याचा प्रथम सातारा पोलिसांनी छडा लावत एका आरोपीला अटक केली होती. त्यानंतर हा गुन्हा बंडगार्डन पोलिसांकडे वर्ग केला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना पुणे पोलीसांना दोघांना अटक केली होती. तपासात शेवाणी यांच्या दुकानात काम करणार्‍या नोकराचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते.

त्यानंतर दोघांना अटक केली होती. तर, तिघांचा शोध सुरू होता. त्यावेळी कदम यांच्याबाबत युनिट दोनच्या पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार, तो सातारा येथे त्याच्या वडिलांना भेटण्यासाठी येणार असल्याचे समजल्यानंतर त्याला पकडण्यात आले.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक महेंद्र जगताप व त्यांच्या पथकाने अटक केली.