मोबाईल शॉपी फोडली, चोरटा काही तासात जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   लष्कर भागात मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी सराईताला खडक पोलिसांनी काही तासात सापळा रचून पकडले. त्याच्याकडून दीड लाखाचे १४ मोबाईल जप्त केले आहेत.

तौसीफ बसीर शेख (वय २२, रा. काशेवाडी, भवानी पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

लष्कर भागात एम डी आब्बास मोबाईल शॉपी आहे. ती मोबाईल शॉपी फोडून ४६ हजार रुपये किंमतीचे मोबाईल घरफोडी करून नेल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी समोर आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू होता. यादरम्यान खडक पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी अजीज बेग यांना माहिती मिळाली, की मोबाईल शॉपी फोडणारा सराईत असलेल्या तौसीफ शेख याने केली आहे. तो भवानी पेठेतील स्वामी समर्थ मठाजवळ आहे. त्यानुसार शुक्रवारी दुपारी सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवलील दुचाकीत वेगवेगळ्या कंपन्याच्या तब्बल १४ मोबाईल मिळून आले. त्याबाबत चौकशी केल्यानंतर त्याने मोबाईल शॉपी फोडल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन लष्कर पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. शेख याच्यावर पूर्वीचे 5 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्याला गेल्या वर्षी एका वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. तडीपारी संपवून तो नुकताच आला होता. त्यानंतर पुन्हा घरफोड्या सुरू केल्याचे आढळून आले आहे. वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव, उत्तम चक्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like