Pune : सराईताला चतुःशृंगी पोलिसांनी सापळा रचून अटक करत 3 गुन्ह्यांतील सव्वासात लाख रुपयांचा ऐवज जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  शहरात 100 हून अधिक गुन्हे दाखल असणाऱ्या सराईत गुन्हेगाराला चतुःशृंगी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून 3 गुन्हे उघडकीस आणत सव्वासात लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

जयवंत ऊर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड (वय 32, रा. डी.पी. रोड, औंध) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. यादरम्यान चतुःशृंगी पोलिसांचे तपास पथक माहिती घेत असताना उपनिरीक्षक प्रेम वाघमोरे यांना बतमीदारामार्फत माहिती मिळाली की, सराईत गुन्हेगार जयवंत याने फेब्रुवारी महिन्यात घरफोड्या केल्या आहेत. त्यानुसार पथकाने त्याला सापळा रचून पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने 3 घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 7 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई परिमंडळ चारचे उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे, उपनिरीक्षक प्रेम वाघमोरे, सारस साळवी, ज्ञानेश्वर मुळे, संतोष जाधव, तेजस चोपडे यांच्या पथकाने केली.

You might also like