Pune : पुणे स्टेशन परिसरात भरदिवसा मोबाईल हिसकाविणार्‍या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पकडलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  रेकॉर्डवरील गुन्हेगाराने पुणे स्टेशन परिसरात भरदिवसा हातातील मोबाईल हिसकावत धक्का देऊन पलायन केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याला पोलिसांनी पकडले आहे.

राजेश उर्फ चौपाट्या मंगल मंडल (वय 25, निगडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अधीर बिस्वास (वय 33) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे निगडी येथे रहातात. दरम्यान ते गुरुवारी सायंकाळी पुणे स्टेशन येथे आले होते. त्यांचे काम असल्याने ते स्टेशन बाहेरील दर्गा जवळ थांबले असताना राजेश हा त्याठिकाणी आला व त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत त्यांना धक्का देऊन पसार झाला. माहिती मिळताच बंडगार्डन पोलीस पथकाने त्याला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.