Pune : पुण्यात भरदिवसा सराईत वाहन चोर अन् पोलिसांमध्ये तासभर फिल्मी स्टाईलने ‘थरार’, अखेर ‘अभिषेक’च्या मुसक्या आवळल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सराईत वाहन चोर आणि पुणे पोलिसांच्या बिट मार्शलमध्ये झालेला तासभराचा थरार आज पुणेकरांना अनुभवायला मिळाला. त्याच झालं असं एकजण धावत पळत चौकीत आला व त्याने माझी आय 10 कार चोरीला गेली आहे. तीच लोकेशन माझ्या मोबाईलवर येत असल्याची माहिती दिली. बिट मार्शलवर असलेल्या कर्मचारी वैभव हिलाल व संग्राम वरपे पाटील यांनी गांभीर्य ओळखत लागलीच त्या कारचा पाठलाग केला आणि दोन वेळा अंगावर कार घालून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना आरोपीला पकडले आहे. बिट मार्शलच्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अभिषेक पवार (वय 29) असे या रंगेहात पकडलेल्या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मिळालेली माहितीनुसार, लष्कर पोलीस ठाण्यातील एका चौकीला कर्मचारी वैभव हिलाल आणि संग्राम वरपे पाटील हे बिट मार्शल म्हणून काम करतात. दरम्यान ते हद्दीत राउंड मारून चौकीला आले होते. पाणी पीत असतानाच एक व्यक्ती धावत पळत चौकीला आली व त्या व्यक्तीने माझी आय 10 कार ही चोरीला गेली आहे, अशी माहिती दिली. कार रोडच्या कडेला होती, त्यावेळी हा प्रकार घडला असून, कारला जीपीएस लोकेशन आहे, त्याचे लोकेशन माझ्या मोबाईल येत असल्याचे सांगितले.

मग, लागलीच कर्मचाऱ्यांनी तुम्ही काळजी करू नका, कार मिळेल असे म्हणत संग्राम यांनी त्यांना तुम्ही माझ्या फुचकीवर बसा आणि लोकेशन सांगा,असे सांगितले व वैभव यांना दुसरी दुचमी घेऊन येण्यास सांगितले. तर ही माहिती पोलीस ठाण्याल कळवली. यानुसार चोर-पोलीस थरार सुरू झाला.कारचे लोकेशन हे प्रथम सोलापूर बाजार परिसरातील हिचिंग स्कुलकडे होते. त्यानुसार त्याचा पाठलाग सुरू केला. त्यानंतर कार वानवडी बाजाराकडे गेली तसे हे कर्मचारी देखील पाठीमागे होते. पुन्हा कोंढवाकडे जात असल्याचे समजताच वैभव हे दुसऱ्या रस्त्याने कमांड हॉस्पिटलकडे आले आणि संग्राम व कार मालक दुसऱ्या रस्त्याने आता चोरटा सापडला म्हणत असतानाच त्याने कार अंगावर घालत तेथून पळ काढला. दुचाकी बाजूला घेतल्याने कर्मचारी बचावले. पण, त्यांनी पुन्हा त्याचा पाठलाग सुरू केला. कोंढाव्याकडे जात असताना त्याचा पाठलाग करून त्याला रेसकोर्सच्या मेनगेटसमोर पकडले गेले. त्यानंतर त्याला घेऊन बिट मार्शल पोलीस ठाण्यात आले.

बिट मार्शलने केलेल्या या धाडसी कारवाईने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. एका घटनेत चोरट्याला पाहून पोलीस पळाले होते. यानंतर पोलिसांवर नामुष्की आली होती. पण या कर्मचाऱ्यांनी चक्क एक तास पाठलाग करून धाडसाने या चोरट्यांना पकडले आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांनी अत्यंत धाडसी कारवाई केली आहे. त्यांचे कौतुक आहे. पुणेकरांच्या सेवेसाठी पोलीस 24 तास उपलब्ध आहेत. या कर्मचाऱ्यांना योग्य बक्षीस दिले जाईल.

सागर पाटील (पोलीस उपायुक्त, परिमंडळ-2)