कारमधून येऊन घरफोड्या करणारा सराईत जाळ्यात, 18 लाखांचा ऐवज जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कारमधून येऊन घरफोड्या करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून तबल 18 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हे उघडकीस आले असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

जयवंत उर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड (वय 31, रा. पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. या गुन्हेगारांना जेरबंद करण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत.

तत्पूर्वी समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या आठवड्यात घरफोडी झाली होती. त्याचा तपास करण्यात येत होता. यावेळी तांत्रिक माहितीच्या आधारे ही घरफोडी सराईत गुन्हेगार जयवंत याने केली असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याचा शोध घेण्यात येत होत. यावेळी तो बालेवाडी फाटा येथे येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार संतोष काळे यांना मिळाली. त्यानुसार परिमंडळ एकच्या उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम, उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, कर्मचारी सुमित खुट्टे, अनिल शिंदे, साहिल शेख, निलेश साबळे यांच्या पथकाने त्याला सापळा रचून अटक केली. त्यावेळी त्याच्याकडून प्रथम 20 तोळे सोन्याचे दागिने मिळाले. त्याला ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता त्याने 2 घरफोड्या केल्या असल्याचे सांगितले. त्यांनतर त्याच्याकडून एकूण 64 तोळे सोन्याचे दागिने, कार आणि इतर साहित्य असा एकूण 17 लाख 86 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

जयवंत हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्या यापूर्वीचे तबल 60 गुन्हे दाखल आहेत. यात चोरी, घरफोडी अश्या गुन्ह्याचा समावेश आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like