3 वर्षांपासून फरार असलेल्याला पश्चिम बंगालमधून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सरफी व्यापाऱ्याचे ५६ लाखांचे दागिने घेउन फरार झालेल्यास फरासखाना पोलिसांनी पश्चिम बंगालमधून जेरबंद केले. सुभाष घोष (रा. पश्चिम बंगाल) असे जेरबंद केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोने व्यापाऱ्याला फसवून ५६ लाखांचे दागिने पळवून नेण्याची घटना २०१७ मध्ये घडली होती. त्यापैकी एकाला पोलिसांनी जेरबंद केले होते. त्याचा साथीदार सुभाष तीन वर्षांपासून फरार झाला होता. चौकशीदरम्यान सुभाष पश्चिम बंगालमध्ये घरी असल्याची माहिती फरासखाना पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला जेरबंद केले.

पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक यशपाल सूर्यवंशी, प्रमोद हंबीर, बापू खुटवड, सयाजी चव्हाण, केदार आढाव, मोहन दळवी, दीनेश भांदुर्गे, महावीर वलटे, मयूर भोकरे, अमोल सरडे, हनीफ शेख, विशाल चौगुले, अमेय रसाळ यांच्या पथकाने केली.