‘अबतक’ 62 ! घरफोडया करणार्‍या सराईताला पुणे पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात यापूर्वी ‘६२’ घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारास कोंढवा पोलिसांनी सापडला रचून अटक केली. त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत.
फिरोज अल्ताफ शेख (वय 32, रा.येवलेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

शेख पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी विविध पोलीस ठाण्यात तब्बल घरफोडीचे ६२ गुन्हे दाखल आहेत. दरम्यान कोंढवा पोलीस घरफाडीच्या गुन्ह्याचा तपास करत होते. त्यावेळी सीसीटीव्हीची पडताळणी करत असताना त्यात शेख हा कैद झाला होता. त्याची माहिती काढत असताना पोलीस कर्मचारी याना माहिती मिळाली कि, शेख हा परिसरात आला आहे. त्यानुसार
परिमंडळ पाचचे पोलीस उप आयुक्त सुहास बावचे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, पथकाचे सहायक निरीक्षक चेतन मोरे, उपनिरीक्षक संतोष शिंदे, कर्मचारी वनवे, उमाकांत स्वामी यांच्या पथकाने केली.

Visit :  Policenama.com