Pune : पिंपरी-चिंचवड परिसरात खून करून पसार होणार्‍याला डेक्कनच्या नदीपात्रात पकडलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड भागात खून करून पसार झालेल्या सराइत गुन्हेगाराला डेक्कन नदीपात्रात पकडण्यात आले आहे.

अक्षय प्रकाश माने (वय २४, रा. पर्वती दर्शन) असे पकडलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

माने व साथीदारांनी पूर्ववैमनस्यातून गेल्या महिन्यात निगडीत शक्तीमान प्रकाश कांबळे याचा खून केला होता. खून करून अक्षय हा पसार झाला होता. गेल्या एक महिन्यापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. त्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. यादरम्यान तो रात्री डेक्कन नदीपात्रातीतल रस्त्यावर थांबल्याची माहिती डेक्कन पोलिसांना मिळाली. यावेळी त्याला सापळा लावून पकडले.

पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक मुरलीधर करपे, उपनिरीक्षक किशोर शिंदे, हवालदार गद्रे, चव्हाण, शिंगाडे, डामसे, वाघमारे, रायकर, कोटकर यांच्या पथकाने कारवाई केली आहे.