पुण्यात एटीएम मशील फोडणारा अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एटीएम मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास मार्केटयार्ड पोलिसांनी अटक केली. मंगळवारी रात्री हा प्रकार गुलटेकडीतील आंध्रा बँक एटीएम सेंटरमध्ये घडला आहे.

कमलेश कुमार यादव उर्फ सूरज रामदीन कोरी (वय १९, रा. मार्केटयार्ड, मूळ- उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे. योहान वेलुवला (वय ३४, रा. बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलेश मूळचा उत्तरप्रदेशातील प्रतागडचा रहिवाशी आहे. मागील दहा दिवसांपुर्वी तो कामानिमित्त मार्केटयार्ड परिसरात आला होता. त्यानंतर काल मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास गुलटेकडी परिसरातील आंध्रा बँकेचे एटीएम मशीन फोडून रक्कम चोरी करण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला जेरबंद केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक केतकी चव्हाण अधिक तपास करीत आहेत.