पुणे : दुचाकी चोरणाऱ्या तिघांना येरवडा पोलिसांकडून अटक, 13 दुचाकी जप्त

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरातील विविध भागातून दुचाकीची चोरणाऱ्या तिघाना येरवडा पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून २ लाख ७५ हजार रुपयांच्या १३ दुचाकी जप्त केल्या आहेत. पप्पू उर्फ विकास राजू शेलार (वय २२, रा. डोंगरगण, शिरुर), रमेश शंकर कणिंगध्वज (वय ३३, रा. शेरीकासारी, पारनेर, नगर ) आणि अमोल नारायण सूर्यवंशी (वय २०, रा.एअरपोर्ट रस्ता पुणे) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

शह्रातून दररोज ४ ते ५ वाहने चोरीला जात आहेत. मात्र, पोलिसांना या घटना रोखण्यात अपयश येत आहे. दरम्यान येरवडा पोलिस हद्दीत गस्ती घालत होते, यादरम्यान कारागृह परिसरातील शनिमंदीराजवळ एकजण चोरीची दुचाकी घेऊन उभा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख, पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, बाळासाहेब बहिरट, हणमंत जाधव, मनोज कुदळे, अशोक गवळी, नवनाथ मोहिते, सुनील सकट यांच्या पथकाने सापळा रचून तिघांना पकडले.

चौकशीत त्यांच्या ताब्यातील दुचाकी चोरिची असंल्याचे निषन्न झाले. सखोल तपास केला असता त्यांनी तिघांनी मिळून येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ६, शिरुर ग्रामीण २, सुपा नगर २, खेड आणि पारनेर हद्दीतून प्रत्येकी एक अशा १३ दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे.

Visit : Policenama.com