मंदिराताली दान पेटी चोरणार्‍यांस अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मंदिरातील दान पेटी फोडून त्यातील रक्कम चोरणार्‍या दोघांना वानवडी पोलीसांनी अटक केली आहे.

संदीप गोपाळ करूळ (रा. मोहम्मदवाडी) आणि शैलेश नारायण जाधव (वय 38, रा. तरवडे वस्ती, मोहम्मदवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत राजे कुमार (वय 47) यांनी फिर्याद दिली आहे. वानवडी परिसरात एका हॉस्पीटलमध्ये नारायणाचे मंदिर आहे. दोन दिवसांपुर्वी अज्ञातांनी या मंदिरातील दान पेटी फोडून त्यातील 2 ते 3 हजार रुपये चोरून नेल्याचा प्रकार समोर आला होता.

वरिष्ठ निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी चोरट्यांना पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या. परिसरातील सीसीटीव्ही पडताळणी केली. तसेच माहिती काढल्यानंतर या दोघांची माहिती मिळाली. त्यानुसार, त्यांना अटक करण्यात आली. अधिक तपास सहाय्यक फौजदार प्रदीप गुरूव हे करत आहेत.

पुणे – शहरात लुटमारीच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या असून, त्यात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. वानवडीत एका किराणा माल विक्रेत्याला लुटले. तर, कोरेगांव पार्कमध्ये एका पादचार्‍याला लुटले आहे. शहरात लुटमारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचेही यावरून दिसत आहे.

वानवडी पोलीसांनी इरफान वाहिद अन्सारी (वय 24, रा. सय्यदनगर) याला अटक केली आहे. तर, त्याचे दोन साथीदार पसार झाले आहेत. याबाबत 22 वर्षीय व्यावसायिकाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींचे या परिसरात किराणा मालाचे दुकान आहे. आरोपी पाण्याची बाटली खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात आले. फिर्यादींनी त्यांना पाण्याच्या बाटलीचे पैसे द्याावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर अन्सारी आणि त्याच्या बरोबर असलेल्या साथीदारांनी विक्रेत्याला धमकावले. ‘आम्ही या भागातील गुंड आहोत. पैसे कसले मागतो,’ असे सांगून मारहाण केली. तसेच दुकानातील वीस हजारांची रोकड नेली.

दुसर्‍या घटनेत कोरेगाव पार्क भागात पादचार्‍याला लुटल्याप्रकरणी संदीप भिकू रणदिवे (वय 19) आणि नीरज आशाराम वाल्मिकी (वय 19, दोघे रा. बोपखेल) यांना अटक केली.

सुनिल राय (वय 22,रा. कवडेवाडी, कोरेगाव पार्क) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
राय एका हॉटेलमध्ये कामगार आहे. पहाटे तो घरी जात असताना दुचाकीवरुन आलेल्यांनी पत्ता विचारण्याचा बहाणाकरून अडविले. तसेच, धमकावत खिशातील 6 हजारांचा मोबाइल घेऊन पोबारा केला. पोलीस हवालदार दिनेश शिंदे तपास करत आहेत.

एसटी स्थानकात महिला प्रवाशाच्या पिशवीतील दागिने लंपास
पुणे –
स्वारगेट बस स्थानकात एका प्रवाशी महिलेजवळील सव्वा लाखांचे दागिने चोरट्यांनी पळविले. याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला रायगड जिल्ह्यातील रोहा गावाची आहे. दिवे आगार येथे जाणार्‍या बसमध्ये ती प्रवेश करत होती.

त्यावेळी बसमध्ये प्रवाशांच्या गर्दी होती. चोरट्याने गर्दीत महिलेच्या पिशवीतील 1 लाख 25 हजारांचे दागिने लांबविले. पोलीस हवालदार कदम तपास करत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवाशांकडील ऐवज लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like