एटीएम मशीनवर दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी पकडली

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – सिंहगड भागात एटीएम सेंटरवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहाजणांच्या टोळीला सिंहगड पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून शस्त्रे, मिरचीपूड, मोबाईल, तीन दुचाकी मिळून १ लाख ८३ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.

विकास गंगाराम राठोड (वय ३०, रा. धायरीगाव), प्रथमेश महादू येणपूरे (वय २०, रा. दत्तनगर), अनिकेत शिवाजी घायतडक (वय १९, हडपसर), आकाश अरुण पवार (वय २२, रा. दत्तनगर, कात्रज), जिशान हबीब अन्सारी (वय १९, रा. पनवेल), योगेश रमेश जगधने (वय २५, रा. बिबवेवाडी) अशी जेरबंद केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार संतोष क्षीरसागर यांनी सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सिंहगड पोलिस काल रात्री दीड वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी हिंगणे बस स्थानकाजवळ पोलिसांना तीन दुचाकी दिसून आल्या. त्यामुळे त्याठिकाणी जाउन पाहणी केली असता, विकास, प्रथमेश, अनिकेत, आकाश, जिशान, योगेश लपलेले दिसून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असता, चौकशीत त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिले. अंगझडतीत त्यांच्याकडे शस्त्रे, मिरचीपूड, मोबाईल, दोरी असा मिळून १ लाख ८३ हजारांचा ऐवज मिळून आला. उपनिरीक्षक किरण अडागळे अधिक तपास करीत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like