तुर्कस्थानचा नागरिक असल्याचे सांगत २५ हजार पळविणारा इराणी अटकेत

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – तुर्कस्थानचा नागरिक असल्याचे सांगत औषध विक्रेत्याची २५ हजाराची रोकड लंबिलेल्या टुरिष्ट व्हिझावर भारतात आलेल्या एक इराणी नागरिकास गुन्हे शाखेने अटक केली. त्याची पत्नी व मुलासोबत तो काही दिवसापूर्वी पुण्यात आला आहे. मोहम्मद अबोलफाजल (वय २८, करज तेहरान, फर्जिस, इराण) असे अटक केल्याचे नाव आहे.

याप्रकरणी २३ वर्षीय तरुणाने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वडगाव शेरीत लाइफ केअर मेडिकल आहे. येथे दोन दिवसांपुर्वी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास एका महिलेसह दोघेजण औषध खरेदीच्या निमित्ताने मेडिकलेमध्ये आले. त्यावेळी औषध विक्रेत्याला तुर्कस्थानचा नागरिक असल्याचे सांगितले. तसेच गप्पा मारत त्याने भारतीय चलनातील नोटा पाहण्यासाठी ५० हजार रुपयांच्या नोटांचा बंडल घेउन हातचलखीने २४ हजार ५०० रुपये काढून घेत पोबारा केला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा करत होती.

या दरम्यान उपनिरीक्षक विजय झंझाड व त्यांचे पथक आरोपींचा माग काढत होते. यावेळी येथील सीसीटीव्ही पहिले असता त्यात आरोपी कैद झाले होते. त्याचा अभ्यास करण्यात आला. त्यावेळी अश्या प्रकारचे गुन्हे इराणी करत असल्याचे लक्षात आले. त्यानुसार त्यांचा शोध सुरु केला.

त्यावेळी बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, ढोले पाटील रोडवरील एक पंचतारांकीत हॉटेलात इराणी जोडपे राहण्यास आले असून त्यांचे आणि सीसीसीटीव्हीचे फुटेज मिळते जुळते आहे. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अंजुम बागवान, उपनिरीक्षक विजय झंझाड, कर्मचारी तुपे तसेच त्यांचे पथकाने या दोघांना हॉटेलात जेवण करण्यासाठी आल्यानंतर सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्या जवळ चोरलेली २४ हजार ५०० रुपयांची रोकड मिळून आली.

हे दाम्पत्य जून २०१९ मध्ये टुरिष्ट विझावर भारतात आले आहे. तो दिल्लीत राहत होता. १७ नोव्हेम्बरला तो पुण्यात आला असून येथील एक पंचतारांकित हॉटेलात राहत होता.

Visit : Policenama.com