home page top 1

पुण्यात पोलीस निरीक्षकाला शिवीगाळ, एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – व्हिआयपी बंदोबस्तादरम्यान पोलीस निरीक्षकालाच शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार आज (शुक्रवार) दुपारी येरवडा येथे घडला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार पॉडीचेरीच्या राज्यपाल डॉ. किरण बेदी यांच्या व्हिआयपी बंदोबस्तादरम्यान  घडला. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रमेश साठे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी रामदास पिलाजी शिरगावे (वय-40 रा. कोकणीपाडा, मुंबई) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

पॉडीचेरीच्या राज्यपाल डॉ. किरण बेदी या पुणे दौऱ्यावर आल्या आहेत. त्यांच्या सरकारी वाहनांचा ताफा येरवडा गुंजन चौक येथून पुढे जाणार असल्याने दुपारी बाराच्या सुमारास गुंजन चौक ते पर्णकुटी चौकी दरम्यान वाहतूक कोंडी झाली होती. येरवडा वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडी का झाली याची माहिती घेत असताना गाडीतळ चौकात स्विफ्ट कार (एमएच 47 केबी 5743) रस्त्यात उभी केली होती. वाहन चालकाला गाडी बाजूला काढण्यासाठी सांगण्यासाठी गेलेल्या वाहतूक पोलिसांसोबत वाहन चालक रामदास याने हुज्जत घालण्यास सुरुवात केली.

वाहतूक कोंडी लवकर सोडवण्यासाठी तिथे आलेले पोलीस निरीक्षक रमेश साठे यांना देखील त्याने वादविवाद करून शिवीगाळ केली. याप्रकरणी शिविगाळ करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून चालकाला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत.

Loading...
You might also like