Pune : दहशत निर्माण करण्यासाठी पिस्तूल बाळगलं, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   दहशत निर्माण करण्यासाठी पिस्तुल बाळगणाऱ्या तरुणाला भारती विद्याापीठ पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून पिस्तुल व 1 काडतुस जप्त करण्यात आले आहे.

अजिनाथ चंदू खंदारे (वय २३,रा. ओंकार सोसायटी, नर्हे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारती विद्यापीठ पोलिस दत्तनगर चौकात मास्क परिधान न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत होते. त्यावेळी तरुणाकडे देशी बनावटीचे पिस्तुल असून त्याने दहशत निर्माण करण्यासाठी पिस्तुल बाळगले आहे, अशी माहिती तपास पथकातील पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तेथे सापळा लावून खंदारेला पकडले. त्याची झडती घेतली. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पिस्तुल व 1 काडतुस सापडले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत कुवर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भूषण कोते, कुंदन शिंदे, कृष्णा बढे, गणेश चिंचकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.