‘चोर भी दिलदार होते है भाई’, पुणे पोलिसांना आला ‘अनुभव’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चोर भी दिलदार होते है भाई, असेच म्हण्याची वेळ सध्या पुणे पोलिसांवर आली आहे. कारण, एका दुचाकी चोरट्याला विश्रामबाग पोलिसांनी पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता तो काम करत असणार्‍या कंपनीतील ज्या कामगारांकडे दुचाकी नाहीत, अशांना दुचाकी वापरण्यास देत होता. हे पाहून पोलीसही आवक झाले आहेत.

विजय रमेशराव शेंडे (वय 32, रा. सहजपुर, ता. दौंड) असे अटक केलेल्याचे चोरट्याचे नाव आहे.
शहरात घरफोड्यांसोबतच वाहन चोरीचा प्रश्न गंभीर झाला आहे. दररोज वाहने चोरीला जात असून, या चोर्‍या रोखण्यात पोलिसांना यश येत नसल्याचे दिसत आहे. गुन्हे शाखा तर नावालाच उरली असून, त्यांना गुन्हे रोखणे सोडाच पण, गुन्हेगारही सापडत नसल्याचे दिसत आहे.

दरम्यान, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस नाईक बाबा दांगडे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, विजय शेंडे याच्याकडे चोरीची दुचाकी असून, तो पुना बेकरीजवळ थांबला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा, उपनिरीक्षक विजय जाधव, समाधान कदम, पोलीस नाईक बाबा दांगडे, विठ्ठल खिलारे, प्रशांत शिंदे, विनोद ओंबासे यांच्या पथकाने छापा टाकून ताब्यात घेतले.

त्याच्याकडे दुचाकीबाबत चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरल्याची कबूली दिली. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन सखोल तपास घेतला असता त्याने विविध भागातून 7 दुचाकी चोरल्याचे सांगितले. तो बनावट चावीने दुचाकी चोरत असे. किंवा दुचाकी चालवत घेऊन तो चावी बनविणार्‍याकडे जात असे. त्यांना पत्नीशी भांडण झाले आहे. ती चावी घेऊन गेल्याचे सांगून त्यांच्याकडून चावी बनवून घेत असे.
तत्पुर्वी विजय हा मुळचा चंद्रपुर जिल्ह्यातील आहे. तो सुताती या कंपनीत दिड वर्षांपासून नोकरीस आहे.

त्याने चोरलेल्या दुचाकी या येथे काम करणार्‍या पण, ज्यांच्याकडे येण्या-जाण्यासाठी दुचाकी नाहीत, अशा कामगारांना वापरण्यासाठी दिल्या होत्या, असे तपासात समोर आले आहे.

You might also like