दुचाकीवर सिगारेटची विक्री करणार्‍याला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   शहरात संचारबंदी लागू असतानाही छुप्या पद्धतीने सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरू आहे. घरपोच या वस्तू नेहून देण्यात येत असून, दुचाकीवर विदेशी सिगारेटची विक्रीचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. अंमली पदार्थ व खंडणी विरोधी पथकाने एकाला पकडले आहे. त्याच्याकडून दुचाकी आणि विविध विदेशी सिगारेटचे पॅकेट मिळून २ लाख ४८ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.

महंमद अब्दुललतीफ नौफान (रा. रक्षालेखा सोसायटी, कोरेगाव पार्वâ ) असे जेरबंद केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सर्व आस्थापना बंद आहेत. संचारबंदी आहे. मात्र, बंद कालावधीचा गैरफायदा घेउन जादा पैसे कमविण्याच्या हेतूने कोरेगाव पार्क येथे दुचाकीवर विदेशी सिगारेटची विक्री केली जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून बनावट ग्राहक पाठवून महंमदला रंगेहात पकडले. त्याच्याकडून २ लाख २२ हजार ५०० रुपयांची विदेशी सिगारेट जप्त करण्यात आली. चौकशीत त्याने सिगारेटची विक्री करीत असल्याची कबुली दिली.

पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय टिकोळे, सहायक पोलीस निरीक्षक बापू रायकर, दिलीप जोशी, प्रवीण शिर्वेâ, मोहन साळवी, राहूल जोशी, मीना पिंजण, विशाल शिंदे यांच्या पथकाने केली.