बेकायदेशीर पिस्तूल बाळगणार्‍यास पकडले

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – बेकायदेशीर रित्या पिस्तूल बाळगणार्‍या एकाला वारजे माळवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल व 1 जिंवत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

परशुराम सुरेश काळभोर (वय 23, रा. कामटे वस्ती, एन.डी.ए रोड, वारजे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर आर्म अ‍ॅक्टनुसार वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात घड़फोड्या, वाहन चोरी, लुटमारीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्याला पायबंद घालण्यासाठी तसेच सराईत गुन्हेगार व पाहिजे आरोपींवर लक्ष ठेवण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार, स्थानिक पोलीस हद्दीत गस्त घालत आहेत.

दरम्यान, वारजे माळवाडी पोलीस हद्दीत गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळाली की, वारजे गावठाण येथील स्मशान भूमीजवळ एक व्यक्ती उभा असून, त्याच्या कंबरेला पिस्तूल आहे. त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने याठिकाणी सापळा रचून परशुराम याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस मिळाले. त्याने हे पिस्तूल कोठून आणले. त्याचा वापर केला आहे का, किंवा कशासाठी आणले होते, याचा तपास करण्यात येत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like