पुण्यात वाहतुक पोलिसाला धक्काबुक्की, एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सिट बेल्ट न लावताच चाललेल्या स्कॉर्पीओ चालकावर कारवाई करत असताना चालकाने वाहतुक पोलिसाला धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वाहन चालकाला कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि.18) दुपारी साडे चारच्या सुमरास कोरेगाव पार्क येथील फिलीप्स कंपनीच्या क्वर्टर समोर घडली.

विनीत रविंद्र इंगळे (वय-19 रा. राहुल कालनी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या वाहन चालकाचे नाव आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क वाहतुक विभागातील पोलीस नाईक मिनिनाथ भागवत यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विनीत इंगळे याच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे फिलीप्स कंपनीच्या क्वार्टर समोर कर्तव्य बजावत होते. त्यावेळी आरोपी विनीत इंगळे हा विना सिटबेल्ट गाडी चालवत असल्याचे दिसले. त्यामुळे त्याला गाडी बाजूला घेण्यास सांगितले असता त्याने भागवत यांच्यासोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तसेच वाहन बाजूला न घेता दमदाटी करण्यास सुरुवात केली. त्याला समजावून सांगत असताना त्याने भागवत यांच्या अंगावर धावुन जात मी 302 केला आहे. तुम्हाला पाहून घेतो असे म्हणत शिवीगाळ करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक के.एस. लोंढे करीत आहेत.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like