पुणे : दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला हडपसर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून कोयता, मिरचीपूड, कटावणी, पालघन, दुचाकी असा ३० हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

योगीराज संदीप पानसरे (वय २०), दीनेश धनंजय राखपसरे (वय १९), सोमनाथ योगेश चौधरी (वय १८, सर्व रा. मांजरी बुद्रुक, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. याबाबत विनोद शिवले यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हडपसर पोलीस काल रात्री गस्तीवर असताना साडेसतरा नळी परिसरात तिघेजण दुचाकीवर संशयास्पद थांबल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी योगीराज, दीनेश, सोमनाथसह त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे कोयता, पालघन, कटावणी, दोरी, दुचाकी असा ऐवज मिळून आला. अधिक चौकशीत साडेसतरा नळी परिसरात दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एस. डी. चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like